Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २४७ )


नानें बादशहास मेजवानी दिली; त्यावेळी, बादशाही ठिकाणापासून आसफखानाचा वाडा एक मैलावर होता तेथपर्यंत सर्व रस्त्यावर रेशमी कपड्याची बिछाईत करण्यांत आली होती आणि मेजवानी व पोशास्त्र या प्रीत्यर्थ पंधरा लाख रुपये खर्च करण्यात आला होता; आसपखान हा जहांगीर बाइशहाचा मेहुणा असून त्याने इंग्रज वकील टेरी यांस एक बाटाची मेजवानी दिली होती, तिचें ही असंच मनोरंजक वर्णन आहे; प्रसिद्ध इंग्रज वकील सर टॉमस रोहा जहांगीरच्या स्वारी बरोबर असताना त्यानें त्या वैभव संपन्न व थाटाच्या स्वारीचे मोठे वाच- नीय वर्णन केले आहे. इ० सन १६१६ च्या नोव्हेंबर महिन्यामध्यें, जहांगीर बादशहाची स्वारी राजवाडा सोडून, तेथून चार पांच मैलावर छावणीत राहण्या- करिता म्हणून बाहेर पडली; त्यावेळीं, दोन तीन हजार उत्तम व चपळ बोडे, आठ नऊशें हत्ती, शिवाय खेचरें, व असंख्य मजूर, या स्वारीचें सामान वाहण्या करिता उपयोगांत आणावें लागले; कारण मोठ मोठे तंबू, भोजनाचे व इतर बहुविध सामान, स्नाना करितां गंगेचे पाणी वगैरे सर्व गोष्टींची बादशहास सर्व ठिकाण जरूरी लागत असे; सर टॉमस रो म्हणतो:-जहांगीर बादशहाची स्वारो सकाळी निर्मावयाची होती; त्याच्या आधीं बादशहा राजवाड्यांतील झरोक्यात येऊन बसला; त्यावेळीं पडद्यांत त्याच्या दोन बायका होत्या त्या ओझरत्या रो याच्या दृष्टीस पडल्या; त्यावेळी त्यास मोठी मौज वाटली. सर्व सरदार दरबारांत बसले, आणि रो हा त्यांच्यामध्ये बसला. इतक्यांत बादशहा तेथें येऊन थोडा वेळ सिंहासनावर बसला; त्यावेळी इकडे स्वतंत्ररित्या राखून टेविलेल्या पन्नास हत्तीवर त्याचा जनानखाना चढव होता; या हत्तींच्या पाठीं- वर मोठमोठे हौदे असून त्यांच्या सभोवती किनखापी पडदे लाविलेले होते; थोड्या वेळाने बादशहा छावणींत जाण्याकरिता निघाला, त्यावेळी सर्व लोकांनीं कानठळ्या बसतील एवया मोठ्याने त्याचा जयघोष केला; जिन्याच्या पाय-