Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २४६ )


सामान्य आकारांची असून त्याच्या हातांच्या मुठी वळून त्या गुढच्यांवर टेंकिलेल्या होत्या. मूर्तीचा वर्ण रक्त कृष्ण असून तिच्या उभय नेत्रांत मौल्यवान हिरे बसविलेले होते; व हे हिरे नेहमीं चकाकत होते. मूर्तीस खाली किंवा वर कोणत्याही प्रकारें आधार नसून ती अंतराळी लटकत उभी होती. हा चमत्कार पाहून महंमूद आश्चर्य चकित झाला; आणि मूर्तीला वरील अथवा खालील बाजूने काहीं तरी अदृश्य आधार अबावा असा संशय येऊन त्यानें भाल्याने सर्व बाजू तपासून पाहिल्या; पुढे विचार करितां एकानें अशी कल्पना काढिली को ही मूर्ती लोखंडाची असून तिच्या डोक्यावरील छत्रास लोहचुंबक ख विलेला असावा; ही कल्पना कांहींना पटली; तेव्हा वरील छत्राचे एक दोन तुकडे काढून मूर्तीचा तोल बिघडतो की काय हे पाहण्याची महमुंदानें आज्ञा केली; वरचे दगड काढण्यास सुरवात करून थोडेसें काढितांच मूर्ति डळमळू लागली, आणि जास्त काढिल्याबरोबर ती हळुहळु साफ जमीनीवर बसली; महमुंदानें आपल्या सोट्यानें हीं मूर्ति फोडिली, त्यावेळी त्या मूर्तीच्या आंतून, तत्क्षणीं हिरेमाणकांचे ढीग खाली जमीनीवर पडले; अशा प्रकारच्या संपत्तिविषयक बाबतींतील आणखी ही अनेक उदाहरणे या ठिकाणीं स्थलाभाषामुळे नमूद केली नाहींत; त्याप्रमाणेच मांगली बादशाहतीच्या वैभवा विषयोंही या ठिकाण, उदाहरणा दाखल थोड्याशा हकीकतीहून अधिक हकीकत स्थलाभावामुळेच देतां येणे शक्य नाहीं. प्रसिद्ध मोंगल बादशहा जहांगीर याच्या वाढदिवसाच्या टोलेजंग समारंभाची हकीकत. मोठी मनोवेधक व त्या बादशाहतीचे वैभवदर्शक आहे. या दिवशीं सोन्याच्या एका मोठ्या ताजव्यांत बादशहाची सहा वेळां तुला करण्यात येई; या तुलेच्या वेळी एका वाजव्यांत सोनें, चांदी, मोत्यें, रेशमी कापड, धान्य, व लोणी, हे सहा पदार्थ ठेवून त्याचे वजन करण्यांत येई व बादशहाची तुला केल्यानंतर त्या सर्व वस्तू गोरगरिबास वाटून देण्यांत येत असत; जहांगिरीची तुला करिताना त्याचें बजन एकदा साडेसहा हजार तोळे व दुसऱ्या वेळीं नऊ हजार तोळे भरले, असा उल्लेख आढळतो. हा समारंभ आटोपल्यावर दुपारी सर्व इत्ती श्रृंगारून मोठ्या समारंभानें बाहेर काढौत; हत्तींचे निरनिराळे कळप असून प्रत्येकावर एक नायक इत्ती प्रमुख असे; या नायक हत्ती बरोबर चार नायिका इतिणी व आठ अथवा दहा इतर इत्ती असत; सर्व हत्तींचें सामान सोन्याचांदीने