Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २४५ )


असून त्यावर मजबूत पहाराहोता; या देवालया इतके श्रीमान असें दुसरे देवालय त्यावेळी हिंदुस्थानात नव्हतें( २४५ ); व या ठिकाणी दरसाल असंख्य यात्रा दर्शनाकरितां जमत होती; देवालयाच्या मंडपाच्या खांबावर नानाप्रकारची चित्रे खोदलेली असून देवालयांत सोन्याच्या साखळ्यांनी बांधिलेल्या अनेक घंटा लोत होत्या व त्यापैकों सोमनाथाच्या घंटेस दोनशे मगाची सोन्यांची सांखळी बांधलेली होती; दरवाजास सुवर्णाांचा व जागोजाग यांचा पत्रा बसविलेला असून आतील मूर्ति नऊ फूट उंच होती; बहुम्तेल असे सोन्याचे व जबाहिराचे दागिने प्रत्यही देवावर चढवीत असत; नित्यशः गंगेच्या पाण्याने लिंगास स्नान वान काश्मीर देशाहून आणिलेली सुंदर व मुवासिक फुले देवास बहात असत; या देवा- ल्या संबंधीं झकेरिया कझीनी या नांवाच्या एका मर्शियन मनप्यानें इ० सन १२६३ मध्ये जी हकीकत लिहून ठेविली आहे, त्यांत असा मजकूर आहे की, सोमना- थाच्या मंदिरास छप्पन सागवानी खांब असून मूर्तीच्या सामन्यांत गुडुप अंधार होता. तथापि त्या ठिकाणी रत्नजडित झुंबरें टांगलेली असून त्यांचा लखलखाट प्रकाश पडत होता. या ठिकाण, चंद्र ग्रहणाच्या प्रसंगी लाखो यात्रेकरू जमत असत; भरतीच्या वेळी मूर्तीब समुद्र लाटांचें स्नान होत असे. मंदिराच्या खर्चास दहा हजार गांवाचे उत्तन्न लावून दिलेले होते; व हजारो भाविक लोक सोमनाथास नेहमीं नानाविध मौल्यवान देणग्या देत होते; त्यामुळे या देवा- लयांत अपार संपत्तीचा संचय झालेला होता. देवाच्या स्नानास दररोज काशीहून गंगोदकाची कावड येत असून त्याच्या पुजेस एक हजार ब्राह्मणांची नेमणूक केलेली होती; व पांचरों कलावंतिणी सेवेस ठेविलेल्या होत्या. मुख्य मूर्ती शिवाय सभोवार सोन्या चांदीच्या आणखी अनेक मूर्ती असून देवाच्या पूजेची उपकरण ही पुष्कळ व अतीशय मोहयवान होतीं. व सर्व संपत्तीची

किंमत तीस कोटी रुपये होईल असा अनमास होता. देवाची मूर्ती मनुष्याच्या



 या शिवाय स्थानपरत्वें माहात्म्य पावलेली कानडा जिल्ह्यांतील पांच लिंगे, कारवार जवळ सेजेश्वर, गोकर्णात महाबळेश्वर, होनावरा जवळ गुणवंतेश्वर, धरिश्वर व मुर्डेश्वर, व दक्षिण हिंदुस्थानांत कांजिवरम्, त्रिचनापल्ली, श्रीकाल हस्ती, तिरुवाणामल्लि, व चिदंबरन् येथील अनुक्रमें पृथ्वि, आप, अग्नि, वायू, व आकाश, हीं पंचतत्वात्मक लिंगें प्रसिद्ध आहेत.