Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २४४ )


आपल्या चौथ्या स्वारीत हिमालयाच्या दक्षिण उतरणीवरील नगरकोट येथील देवस्थान लुटिले; या ठिकाणी ज्वालामुखी पर्वत असल्यामुळे ते पार पवित्र मानिले जात असे;या देवालयास आसपासच्या राजे लोकांकडून नेहमी मौल्यवान देणग्या मिळत असत; त्यामुळे तेथे विपुल संपत्ति जमलेली होती; या देवालयाच्या ठिकाणी विशेष बंदोबस्त नाही अशी वेळ पाहून महंनुदानें तेथे छापा घातला, आणि त्याने तेथील सर्व संपत्ति बन गज्नीस नेली; या प्रसंगी फेरिल्याच्या म्हणण्या प्रमाणे सात लक्ष सुवर्ण दिनार, सातशे मण सोन्या चांदीचे दागिने, दोनशे मण सोन्यांच्या लगडी, दोन हजार मग चांदी, वीस मग मोयें. हि बगैरे जवाहीर, इतके विपुल द्रव्य महनुदास मिळाले; पुढे इ. सन २०१४ मध्ये त्याने हिंदु- स्थानांवर आठवी स्वारी केली त्यावेळी त्याने नगरकोट अथवा कांग्रा उर्फ भीमनगर येथील किल्ला सर करून घेतला, तेव्हां तेथेही त्यास अशीच विपुल संपत्ति मिळाली; शिवाय व्हिलेट स्मिथच्या म्हणण्याप्रमाणे या ठिकाणी निव्वळ चांदीचाच बनविलेला असा एक बंगला होता, तो यावेळी महंमुदास मिळाला. हा बंगला बराच मोठा असून त्याची लांबी ९० फूट व रुंदी ४५ फूट होती, आणि पाहिजे त्या वेळी त्याची घडी करून तो पुन्हा वाटेल तेथे उभा करितां येत होता; सदरचा बंगला हा हिंदुत्थानांतील विपुल संपत्ति बरोबरच त्या देशां- तील अलौकिक कलाकौशल्याचा घोतक आहे, ही गोष्टही महत्वाची व लक्षात ठेवण्यासासारखी आहे त्याप्रमाणेच इ. सन १०२४ मध्ये महमुदाने आपली अकराबी स्वारो हिंदुस्थान देशावर केली त्यावेळी त्याने काठेवाड मधील सौराष्ट्र.

सोमनाथाचे अत्यंत प्रसिद्ध मंदीर लुटिले में या मंदिराच्या सभोवतों कल बटे



 हिंदुस्थानांत बारा ज्योतिर्लिंगे असून त्यांतील सोमनाथ है एक आहे; ह्रीं बारा ज्योतिर्लिंगे खालील प्रमाणे आहेत:-
१ भागचा सोमनाथ, २ उज्जयनीचा महांकाल. ३ हिमालयांतील केदारेश्वर, ४ काशी येथील विश्वेश्वर, ५ चिताभूमींतील परळी वैजनाथ

६ सेतुबंध रामेश्वर,

७ श्री शैल्य मल्लिकार्जुन ८ नर्मदेतील ओंकारेश्वर उर्फ ओंकार मांधाता. ९ डाकिनी वनांतील भिमाशंकर. १० कियेथील विकेश्वर, ११ दारुकानातील अनागनाग.. १२ वेरळना घृणेश्वर,