Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २४३ )


हा अफगाणिस्थानचा राजा झाला. तेव्हां हा कोहिनूर हिरा त्याच्या जवळ आला; त्यावेळे पासून इ० सन १८०७ पर्यंत तो अफगाणिस्थानच्या अमिराच्या संग्रहीं होता; पुढे इ० सन १८०८ मध्ये अफगाणिस्थानांतील पदभ्रष्ट झालेला जुन्या राजवंशांतील अमीर शहामुजा यानें तो पंजाबचा राज्यकर्ता रणजीत सिंह यांस दिला; तो इ० सन १८४८ पर्यंत लाहोर येथें हो; पुढे इ० सन १८४९ मध्ये गव्हर्नर जनरल लाई उल्हासी यानें एक जाहिरनामा काढून त्या अन्वयें पंजाब प्रांत खालसा करून तो ब्रिटिश राज्यास जोडिला; त्यावेळीं रणजीतसिंहाचा मुलगा धुलीपसिंह यानें तो पंजाबचा कारभारी सर जान लारेन्स यांस दिला. व त्यानंतर तो इंग्लंड मध्ये व्हिक्टोरिया राणीस नजर म्हणून पाठविण्यांत आला; पिट व कोहिनूर या दोन हिन्यांपैकी पिट्टचे वजन १३६७ कॅट्स् असून तो आकारानें कोहिनूरहून मोठा आहे; आणि कोहिनूरच वजन १०६६ कॅस्टस् म्हणजे पिट्टहून कमी असूनही तोच पिट्टहून अधिक ऐतिहासिक व पौराणिक महत्वाचा हिरा म्हणून गणला गेलेला आहे; व हिंदुस्थानांतूनच हे दोन्हींही हिरे प्रथम इंग्लंडमध्ये नेण्यांत आले आहेत. कोहिनूर हिन्याचे अगदीं प्रथम वजन ७५६ कॅस्टम् होते; परंतु इतक्या प्रचंड घालमेलींत हा हिरा अनेक वेळी कांपला जाऊन इंग्लंडमध्ये तो पहिल्याने पोहोचला त्या वेळी त्याचे वजन १८६३ कॅट्स होते; त्या प्रमाणेच पिट्ट या हिन्याचे अगर्दी प्रथमचें वजन ४१० कॅट्स होते; परंतु तो इंग्लंडमध्ये गेल्यावर कापण्यांत आला; त्यामुळे त्याचे वजन १३६७ कॅर्टस् झाले; पुढं इ० सन १७१७ मध्ये फारसचा रोजेट अथवा प्रतिनिधी डयूक ऑफ आर्टेन्स यांस तो चिकण्यात आला; हा हिरा डों पारीस येथे असून त्याची किंमत ४८०००० पौंड-अथवा दहा रुपये पौंड या हिशोबाने ४८००००० रुपये आहे; आणि कोहिनूर हा हिरा हों लंडल येथे असून त्याची किंमत १४०००० पौंड- म्हणजे दहा रुपये पौंड या हिवाने १४००००० रुपये आहे; विजयानगरच्या हिंदू राज्याप्रमाणेच हिंदुस्थानातील निरनिराळी मुसलमानी राज्ये व मोंगल बादशाही ही अत्यंत वैभव संपन्न असून, उदाहरणार्थ त्या संबंधीची ही थींडीशी हकीकत या ठिकाणीं ग्रंथित केली आहे.
 गजनवी महंमूद याने हिंदुस्थान देशांवर एकंदर अकररा स्वाऱ्या केल्या, आणि त्यांतील कित्येकांत तर त्यास इकडून पुष्कळच संपत्ति मिळवितां आली. त्यानें