Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २४२ )


घोड्याच्या मस्तकावर अनेक मौल्यवान हिग्या मोत्यांचा एक तुरा असून त्यांत कोंबडीच्या अंड्या एवढा एक मोठा हिरा बसविलेला होता; हा हिरा ताली- कोटच्या युद्ध कालापर्यंत विजयानगरकराजवळ होता; परंतु तालीकोटच्या युद्धानंतर विजयानगरचा पाडाव झाल्यावर ( इ० सन १५६५ ) मुसलमान राज मडळाला तेथून जी अगणित संपत्ति मिळाली, त्यांत "कोंबडीचे अंडे हा हिरा विजापूरकर अदिलशहा यांस मिळाला. पुढे विजयानगरचे राज्य नष्ट झाल्यावर या राज घराण्याचा वंशावशेष पहिल्यानें पेनकोड्यास व नंतर चंद्रगिरी येथे गेला; व तेथे त्याने आपले एक लहानसें राज्य स्थापन केले; त्यानंतर इ० सन १६१४ मध्ये तेथील राज्यकर्त्याजवळ तीन मोठ मोठाल्या पेच्या हिन्यांनी भरलेल्या होत्या, असा उल्लेख आढळतो. विजयानगरकरांच्या “ कोंबडीचें अंडे " या अत्यंत प्रसिद्ध व मोल्यवान हिन्या प्रमाणेच हिंदुस्थानांतील इतर हिरे व त्या प्रमाणेच मोत ही अत्यंत प्रसिद्ध आणि मौल्यवान होतीं. प्रसिद्ध जूलियस सीझर यानें सची आई सव्हीलिया दिला जो एक मौल्यवान व प्रसिद्ध मोती नजर केला होता, तो, आणि क्लिओपाटा हिची जी विशेष किंमती व पाणीदार मोत्याची कानांतील कुंडले ( कर्णफुलं ) होत तीं, हिंदुस्थान देशापासूनच त्यांना मिळालेली होती, जगांतील अत्यंत प्रसिद्ध दोन दिरे – म्हणजे पिट्ट अथवा रोजेट आणि कोहिनूर अथवा कोह-ई- नूर (म्हणजे तेजाचा पर्वत ) हे दोन दिर-हिंदुस्थानांतच पैदा झालेले आहेत. या पैकी कोहिनूर दिश हा इ० सन १६५६ मध्ये कृष्णानदीच्या कांठीं कोटर या नावाच्या गांवों असलेल्या प्रसिद्ध हिन्याच्या खाणीत शहाजहान व अवरंग- झेब यांचा सूर सरदार नीर जुन्ला यांस सापडला त्यावेळी त्याचे वजन ७५६ कॅरटस् होतें; नीर जुम्ला यानें तो न कापता तसाच शहाजहान बादशहास नजर केला. तो हिरा इराणचे राज घराणे धुळीस मिळविणाऱ्या नादीरशहाच्या दिल्ली वरील स्वारी पर्यंत मोगल बादशहाच्या संग्रह होता; परंतु इ० सन १७३५ मध्ये नावीरशहाने दिल्लीवर स्वारी केली. त्यावेळी त्याने त्या शहरांतून तीस कोटी रुपयापर्यंतप्रसिद्ध मयूरासन, त्या बरोबरच हा कोहिनूर दिरा, इराणांत जेला; पुढे इ० सन १७४० मध्ये नादीरशाचा खून झाला व त्याच्याच सैन्यात एका रिसादावर मुख्य सेनापती असलेला प्रसिद्ध अहंमदशहा अबदली