Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २४१ )


असें नांव मिळाले आहे. इराणचा राजकर्ता दरायस (इ. सनापूर्वी ५२१ ते ४८५ ) याच्या ताव्यांत सिंध व पंजाब प्रांताचा कांही भाग असून त्या प्रदेशा- वर त्याने एका हिंदु सुभेदाराची नेमणूक केली होती; त्यावेळी हा सुभेदार दरायस याजकडेस दरवर्षी दीड कोट रुपयांचें सोनें हिंदुस्थानांतून खंडणी दाखल रवाना करीत असे. त्याप्रमाणेच हिरे, मोती, पुष्कराज या नावाची रत्नें, सुंदर पोवळीं, व इतर अनेक प्रकारची मौल्यवान मोर्ती, हिरे, माणके, व रत्ने, याबद्दल हिंदुस्थान देश फार प्रसिद्ध आहे; आणि या सर्व मौल्यवान वस्तूंचा हिंदुस्थान देशांतूनच सर्व जगास पुरवठा झालेला आहे. तथापि या बाबतीत विजयानगरच्या राज्यास प्रमुखत्वाने मान मिळत आहे. कारण पूर्व किनान्यावरील मोत्यांचे कारखाने, पश्चिम किनाऱ्यावरील महत्वाचा व्यापार, आणि राज्यातील महत्वाच्या हिन्यांच्या खाणी, यामुळेच ते राज्य अत्यंत संपत्तिमान व वैभवसंपन्न बनलेले होते. या काळांत या राज्यांतल खाणी इतक्या संपत्ति- मान खपी सर्व जगांत दुसन्या कोणत्याही ठिकाण नव्हत्या, या खाणी पैकीं बन्याच कृष्णानदीच्या काठी कळ व अनंतपूरा प्रांतांत असून सर्वात वज्रकरूर येथील खाणी अत्यंत महत्वाच्या व संपत्तिमान म्हणून प्रसिद्ध होत्या; व या सर्वानां साधारणतः " गोवळकोंड्यांच्या खागी" अशी समान्य संज्ञ होती. अशा प्रकारच्या खाणी विजयानगरच्या राज्यांतच असल्यामुळे तेथील राज्यकर्त्यां जवळ अनेक मौल्यवान हिरे होते. इतकेच नव्हे तर साधारणतः राज्यांतील पुष्कळ लोकांजवळ लदान मोठं अनेक हिरे संग्रहास होते, या राज्यांत संपत्तीचा धूर निघत होता, असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही. कारण प्रत्येक मंदि रांत अगणित संपत्ति भरलेली असून सणावाराव्या व समारंभाव्या प्रसंगी सरदार व इतर अनेक मोठमोठ्या लोकांकडे हजारों वर्षा पासून संचित केलेली अगणित संपत्ति व जड जवाहीर लोकांच्या पाहण्यांत येत असे; त्याप्रमाणेच विजयानगर शहरातही हिरे, माणके, पाचू, मोती वगैरे मोस्यवान जिनसांचा मोठ्या जोरानें नित्य व्यापार चालत असे; या राज्यांतील वर लिहिल्या हिन्यांच्या सर्व खाणी व्याप त्यांनी माने देण्यात येत असत; आणि पंचनीस कॅट्सपेक्षा अधिक वजनाचा हिरा कोणत्याही खाणीतून निवाला तरी तो मत्तेदारानें राजावच दिल: पाहिजे, असा त्याच्याशी उरात्र झालेला असे; विजयानगरच्या रामरायाच्या खास

116