Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६ )

पूर्वी १५०० च्या सुमारास त्यांची संख्या अतीशय वाढली; त्यामुळे त्यांना पुन्हा देशांतर करणे भाग पडले. तेव्हां त्यांच्यापैकीं 'इराणी ' या नांवाच्या एका शाखेने पश्चिम दिशेने प्रयाण करीत इराण देशांत जाऊन तेथे आपली वस्ती केली व दुसरी शाखा हिंदुस्थानांत शिरून तिने पहिल्याने सिंधुनदाच्या दोन्ही तीरांवर वसाहत केली व तेथून हळूहळू ते यमुना नदीच्या काठापर्यंत वसाहत करीत आले. याच लोकांना 'इंडो-आर्यन अशी संज्ञा आहे. या ठिकाणी ते अजमासे पांचशे वर्षे ह्मणजे इ. सनापूर्वी १००० वर्षेपर्यंत राहिले; परंतु या अवधीत त्यांना आपले अस्तित्व कायम ठेवण्याकरिता तेथील मूळच्या अनार्य लोकांशी मोठया चिकाटीने सारखे युद्धकलह करीत रहावे लागले; आणि अशा रीतीने झगडत राहून इ. सनापूर्वी १००० च्या सुमारास आर्य लोक हिंदुस्थानात कायमचे स्थाईक झाले.
 अशा रीतीनें आर्य लोकांना हिंदुस्थानांत स्थाईकत्व प्राप्त झाल्यामुळे त्या देशांतील आर्य लोकांत चार वर्णाची उत्पत्ति होऊन वर्णव्यवस्था सुरू झाली. निरानेराळ्या देवतांपासून आपणास सौख्य प्राप्त व्हावे, म्हणून आर्या- मधील अतांशय विद्वान् लोक ईश्वराचीं निरनिराळी स्तुतिपर कवने तयार करूं लागले, यज्ञयागादि ईश्वर भक्तिपर निरनिराळ्या उपासना आचारूं लागले; म्हणून त्या वर्गाला ' ब्राह्मण ' आर्यपंडित किंवा 'ऋषी' असे नामा- भिधान प्राप्त झाले. हिंदुस्थानातील मूळ रहिवाशांबरोबर झगडण्याचे वारंवार प्रसंग उद्भवत राहिल्यामुळे ' राजन्य' अथवा ' क्षत्रिय वर्ग अस्तित्वांत आला, व आपल्या वसाहतीच्या आसपास वाढलेले रान तोडून तेथे लागवड करण्याकरिता 'वैश्य वर्ग निर्माण झाला. म्हणजे अशा रीतीनें आर्य लोकांत ब्राह्मण, क्षत्रिय, व वैश्य, असे तीन वर्ण निर्माण झाले. या आर्यांनीं हिंदुस्था- नांतील मूळच्या रहिवाशांसही आपणांमध्ये ओटून घेतलें; व त्यांना 'शूद्र' अशी संज्ञा देऊन, चवथा वर्ण निर्माण केला. तथापि यावेळेच्या आर्य लोकांच्या वर्ण- व्यवस्थेस कायमचे व स्थाईक स्वरूप आलेले नव्हते. त्यामुळे शेवटचा म्हणजे जो शूद्र वर्ण त्या शिवायच्या बाकी तीन्हींही वर्णानां एका वर्णातून दुसऱ्या वर्णांत केव्हाही जाता येत होतें. याच आर्यलोकातील ब्राह्मण वर्गाने अथवा विद्वान् आर्य पंडितानी 'ऋग्वेद' या नांवाचा एक ईश्वरस्तुतिपर ग्रंथ निर्माण केला,