Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२३४ )


कर्तबगारीचा एकंदरीने विचार केला असतां, जिंकलेल्या लोकांची स्थिती खरोखर सुधारून त्यांत उन्नत सुखावस्थेप्रत आणण्याचा प्रयत्न ह्या कालांत बहुबा कोणीही केलेला दिसत नाहीं. हा कष्टमय परिणाम मनांत आला म्हणजे ह्या मुसलमान राज्यकर्त्यांविषय मनांत खेद उत्पन्न होतो. रोमन किंवा इतर युरोपियन राष्ट्रानां अशा काम आपल्या कर्तव्याची जबाबदारी जास्त वाटत होती, असे दिसून येतें. रोमन लोकानी जिंकिलेल्या लोकांस सन्मार्गास लाविल त्यांच्या उलट प्रकार येथें (हिंदुस्थानांत ) झाला. येथील रणशूर रजपुतांना नाहीस करून, आणि त्यांच्यांत फाटाफूट पाडून, आपले राज्य कायम ठेवण्या कडेच मुसलमान राज्यकर्त्याची दृष्टी होती. या परकीय ( मुसलमानी ) अंमला- पासून हिंदुस्थानचा फायदा झालेला दिसत नाही. सारांश, पाचशे वर्षांच्या ह्या काळातील हिंदुस्थानच्या स्थितीचा सामग्रयानें विचार केला असतां, अनेक चमत्कारिक भावना मनांत उत्पन्न होतात, आणि विचार शक्ति अधिकाधिक गुंग होऊष जाते. किंबहुना हिंदुस्थान देशाचा एकंदर इतिहासच अशा प्रकारचा अकल गुंग करून टाकणारा आहे. असे म्हणावे लागते. पृथ्वी वरील सर्व राष्ट्रांस आजपर्यंत हिंदुस्थाननें नाचविले आहे, आणि पुढें ही नाचवील असा संभव दिसतो. लार्ड कर्झनचे ( हिंदुस्थान देशासंबंधीचे ) खालील उद्गार सर्वथैव खरे आहेत यात संशय नाहीं. "हिंदुस्थानचा इतिहास, तेथीक राज्यांच्या घडामोडी, व तेथचे प्रचंड उतात, ह्यांच्या योगानें एकंदर मनुष्य जातीवर जेवढा परिणाम घडला आहे तेवढा बहुधा दुसऱ्या कशानेही घडला नसेल. " * ( सरदेसाई कृत मुसलमानी रियासत, हे पुस्तक पहा.)

 अशा प्रकारचा हा हिदुस्थानचा अद्भुत इतिहास असून, कांही म्हटले तरी, एकंदरीनें पाहतां हिंदू लोकां प्रमाणेच मुसलमान लोकांची ही पूर्व कालीन : संस्कृति प्रसिद्ध आहे. या बाबतीत मुसलमानी जगाच्या इतिहासांतील, हिंदु-

स्थानांतील मुसलमानी राज्यांच्या इतिहासातील माहिती मुद्धां अनेक उदाहरणे



 •The history, politics, and spheavals of India, have left s greater impress than almost any other, upon the history of mankind.

Lord Curzon's Speech..

at Eton-Prize Essey, 1909.