Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२३३ )


महात्म्यांनीं जिवापाड मेहनत सुरू केली, तिच्या योगानें, सर्व युरोप खंडभर धर्म जागृति झाली..प्रसिद्ध चित्रकार मिकेल अँजेलो ह्याने रोम शहरीं सेंट पिटर्स या नांवांचे विख्यात मंदिर बांधण्याचे काम सुरु केले. सन १४५३ मध्ये तुर्क लोकांनीं पूर्व रोमन बादशाहीचा पाडाव करून कान्हांटिनोपल उर्फ कुस्तंतुनिया ( इस्तंबूल ) हैं शहर काबीज केलें; तेथे तुर्क बादशहा आज तागाईत राज्य करीत आहे. होकायंत्राच्या शोधाने भूगोल शास्त्रात प्रगति होऊन कोलंबसा सारख्या साहसी पुरुषांनी अमेरिका खंड पाश्चात्यांचे अटोक्यात आणून दिले. हिंदुस्थानांत पेर्तुगीज लोकांचा प्रवेश झाला. इंग्लंडात आठवा हेन्री, फॉन्सवर पहिला फ्रान्सिस, जर्मनी व पेन येथे पहिला चालेस, असे पराक्रमी राजे युरोपात -राज्य करीत असता, हिंदुस्थानांत मांगल बादशाहीची स्थापना झाली. युरोपांत अज्ञानधिकाराचा झपाट्याने नाश होत चालला असतां पूर्वकडे हिंदुस्थानांत नवीन ज्ञानवृद्धी तर दूरच, पण असलेली सुधारणा व ज्ञान ह्यांचा तितक्याच' झपाट्यानें-हास होत चालला होता. नाही म्हणण्यास मराठी भाषेस मात्र या काळी नवीन चलन मिळू लागले होते. संस्कृत भाषेचा अभ्यास उत्तरोत्तर नष्ट होत चालल्या मुळे तीतील ज्ञान भांडारांचा लाभ बहुतेकांस दुर्मिळ झाला. तेव्हां ज्ञानेश्वरा सारख्या पंडितांनी संस्कृतांतील ज्ञानभांडार फोडून, आबाल वृद्ध महाराष्ट्रांसतें लुटण्य खुले करून दिले. ज्ञानदेवाचा हा कित्ता असाच वळविण्याचा प्रघात पडल्यामुळे मराठींत अनेक विद्वान पंडित, व संत कवी निपजून, त्यांनी संस्कृताच्या धर्तीवर मराठीत मोठमोठे ग्रंथ रचिले "हिंदुस्थानात मुसलमान लोक आल्यानंतर आणि त्यांनी या देशांत आपली राज्ये स्थापन केल्यानंतर, "मुसलमान व हिंदू भावाभाव सारखे वागतदोघांतले ही श्रीमंत व सरदार वगैरे लोक हरहमेश एक- मेकांच्या घरीं जात; एकमेकांच्या उपयोगी पडतं, आणि एका कामांत संविभागी होत. समारंभ, उत्सव, किंवा उरूस, वारंवार होत; व त्यांत दोन ही लोक सामील होत. अशा प्रसंगी सर्व प्रकारचे साधू, बैरागी, फकीर, व्यापारी, व कामकरी लोक, एकत्र जमत; निरनिराळ्या विषयावर वादविवाद करीत; आणि अनेक प्रकारचे व्यवहार एकमेकांशी करीत. अशा अर्थाने या दोनही समाजांचा अगदीं एक जीव झाला होता, असे म्हणण्यास हरकत नाहीं; राज्य कारभाररत मुसलमानांनी कितीही कुशलता दाखविली असली तरी त्यांच्या