Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२३५)


देऊन, पुष्कळ विवेचन करिता येण्याचारखे आहे. तथापि The case for Indian, Home Rule या इंग्रजी पुस्तकांतील “हिंदुस्थानची प्राचीन संस्कृति " या संत्र-- धीच्या विवेचनात जो त्रोटक, परंतु मुद्देसूद, व महत्वाची हकीकत दिली आहे, त्यावरूनच मुसलमानांच्या प्राचीन संस्कृतीचा पूर्ण बोध होण्यासारखा असल्याने अधिक व इतर माहिती न देतां स्थलाभावामुळे तीच या ठिकाणीं ग्रंथित केली आहे. ती अशी:- हिंदु लोकांच्या नंतर, हिंदुस्थानचा महत्वाचा घटक बनलेकी दुसरी जात म्हणजे " मुसलमान जात" ही होय. या मुसलमान जातीनें ही, सुधारणेच्या सर्व बाबतींत, हिंदू लोकाप्रमाणेच उत्तम कामगिरी करून दाल- विली आहे. या ठिकाणीं मुसलमानांच्या पूर्वेतिहासात शिरण्याचे आपणास कारण नाहीं; तथापि सोईसाठी, आपण सर्व मुखलमान एक समजूं या. आरब संस्कृतीच्या उच्च कल्पनांनीं, युरोपखंडांत प्रवेश करून तेथे आपली छाप पाडिली, व त्या ठिकाणी त्या दृढमूल झाल्या, ही गोष्ट कोणासाही नाकबूल करितां येणार नाहीं. ज्यावेळी रानटी लोकांनी रोमन साम्राज्य छिन्नविछिन करून टाकिले, व परस्परविरोधी व हट्टी खानुयांच्या कलहानें खिस्तीधर्म हीन स्थितीप्रत जाऊन निःसत्व झाला, त्यावेळीं अरबांनी आपला धर्म व तरवार यांच्या जोरा- वर नवजीवन उत्पन्न केले. मुसलमानांनी पूर्वेकडे आपल्या विजयी सेना आणण् पूर्वीच त्यांनी पश्चिमेकडे विजय संपादन केला होता. आठव्या शतकांत मुसलमानांनीं भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील सर्व प्रदेश काबीज करून जिब्रा- लटर पर्यंत धडाडी मारिली व अवघ्या दहा वर्षांतच सर्व स्पेन देश पादाक्रांत करून फ्रान्समध्ये पॉईटर्सच्या तटापर्यंत ते जाऊन धडकले. गिबन म्हणतो: " या विजयी सेना जिब्रालटरपासून लॉयरपर्यंत एक हजार मैल सारख्या पसर- लेल्या होत्या, व हीच त्यांची गती कायम राहिली असती तर, आरबी फौजा पोलंड, व कॉटलंडमधील हायलँड वरही उतरल्या असत्या: नाईल किंवा युफ्रे- टीस पेक्षां न्हाईन नदी दुर्गम नाहीं. तेव्हा कोठेंही अडथळा आल्याशिवाय आरबी आरमार, थेम्स नदीच्या मुखांतही सुखानें उतरले असते, व कदाचित् आज ऑक्सफोर्डच्या विद्यालयांत कुराण पढविले जाऊन, महंमदी धर्माच्या पावित्र्याबद्दल व सत्यतेबद्दल प्रवचनें सुरू झालीं असत." भारबांची संस्कृति ही त्यांच्या शौर्याहून कमी नव्हती. स्पेनमध्ये त्यांच्या कलेची व विद्याभिलाची स्मृतिचिन्हें भद्यापि दृग्गोचर होत आहेत. त्यांची बरोबरी आजकालचे युरोपियन