Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २३२ )


हिंदुस्थान हा जगांतील अती प्राचीन देशापैकींचा एक देश आहे; आणि हिंदु- स्थानची संस्कृति प्राचीन कालापासून जगभर जाहीर झालेली आहे; "बारा, तेरा व चौदा या तीन शतकांत युरोपियन राष्ट्राची अंतःस्थिती बरीच हीन होती. रस्ते, इमारतो, गांडथा, कपडा, शिल्पकला, इत्यादि बाबतीत हिंदुस्थान देश युरोप खंडाहून श्रेष्ट होता. विजापूर, जोनपूर, येथील उत्कृष्ठ इमारती अद्याप जर लोकास थक्क करितात, तर त्यावेळचे काय वर्णन करावें ! भाषेचा, वांग्मयाचा किंवा व्याकरणाचा युरोपांत उदय मुध्दा झाला नव्हता, त्यावेळेस. हिंदुस्थानांत उत्तमोत्तम काश, व्याकरणे, नाटके, कार्ये, व अलंकार, न्याय, तक, इत्यादिकांवर सर्व मान्य ग्रंथ होऊन चुकले होते; ही गोष्ट मनांत आणिली म्हणजे परकीय अंमलाखाली सुध्दां वरील काळांत 'हिंदुस्थानची स्थिती बरीच समाधानकारक होती असे म्हणावे लागतें. युरोपांत अज्ञानांधकार भरला होता. इंग्लंडच्या उदयास आरंभ नव्हता. इतालीच्या पुनर्जन्माची वार्ता नव्हती. जर्मनी व फ्रान्स येथें बादशाही अंमल नांदत होता; तरी समाज एकंदरीत द्दीन स्थितीतच होता. पुस्तकें छापण्याच्या कलेत आरंभ होऊन ज्ञान वृद्धि होण्यास युरोपीत अजून अवकाश होता; तत्पूर्वी युरोपचे लोक अज्ञानी असून हिंदुस्थानच्या मानाने फारच मागसलेले होते. अटलांटिक महासागरांत अगर आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत सुद्धां जाण्याची युरोपच्या खलाशास छाती होत नसे. अशा वेळी, (हिंदुस्थानांतील ) काठेवाडच्या खलाशांनी पूर्वेस जावा, सुमात्रा, बोर्निओ, व जपान, आणि पश्चिमस, आफ्रिकेच्या दक्षिण किनाऱ्या पावेतों, समुद्र प्रवास करून आपल्या वसाहती स्थापिल्या होत्या. व्यापाराच्या संबंधानेही युरोपखंड तसंच अतीशय मागसलेले होते. अर्वाचिन युरोपांत मुत्सद्दी पुरुषाचें नांवही नव्हते, अशा वेळी हिंदुस्थानांत महंमद गवान, आसदखान, माधवाचार्य, विद्यारण्य ह्यांच्या सारखे राजकारण कुशल पुरुष निपजले. युरोपियन राष्ट्र ह्या वेळेस नूतन ज्ञानाच्या बालक प्रकाशानें नुकतींच कोटे जाग होऊं लागली होतीं, पहिला मोगल बादशहा बाबर हा योग्यतेनें व ज्ञानाने ह्या पुनरज्जीवनाच्या काळास शोभणारा असा होता, इंग्लंड व स्कॉटलंड ह्या दोन देशांमर्थ्य फ़ाइन फील्ड येथे प्रचंड गुद्ध होऊन स्कॉटलंडच्या मध्यकालीन सरदार लोहाचा पाडाव झाला. खिस्ती व मुसलमान यांच्यात सारखे झगडे चालू होते. ख्रिस्ती धर्माची भ्रष्टता जागास दाखविण्या साठीं लूंथर सारख्या