Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 

231


त्यामुळेच हिंदूधर्माला आज हजारों वर्ष हजारों प्रकारच्या झुंजा खेळूनही स्वत्व राखिता आले. ब्रिटिश अमलाखालील हिंदुस्थान हल्लीं संक्रमणावस्थेत आहे. हा संक्रमण काळ हिंदुस्थान देशाच्या पूर्वीच्या संक्रमण काळापेक्षा लहान असला तरी सुद्धा हाच पूर्वीच्याहून फार महत्वाचा आहे; " चिरोल साहेबाच्या वरील भाषणानंतर अध्यक्ष लार्ड मेस्टन यानें समारोप केला; तो असा कीं, “हिंदुधर्मा मधील चिवटपणा फार आश्चर्यकारक आहे; हा हिंदुधर्म, अनेक भयंकर दिव्या- मधून तावून सुलाखून सुरक्षितपणे बाहेर निघालेला आहे. या हिंदुधर्मानें बौद्ध व जैन धर्मातील पुष्कळ तत्वें स्वीकारिली आहेत. मुसलमान लोकांच्या स्वधर्म- इस्लामीधर्म-संस्थापनेच्या बलाढ्य महत्वाकांक्षशीं टकर देऊन या हिंदुधर्माने आपले सत्व रक्षण केले आहे; आणि हजारों वर्षे अशा तऱ्हेनें झुंज चालू असतां ज्या हिंदुधर्मानें टिकाव घरिला. एवढेंच नव्हे तर लक्षावधि अनुयायी मिळविले, त्या धर्माची-म्हणजे त्या हिंदुधर्माची महती अवर्णनीय आहे. यावरून या (हिंदु ) धर्मात स्वयंभू व अमर असेच कांहीं सद्गुण असले पाहिजेत, है - उघड आहे. व हिंदी कौटुंबिक पद्धति, मनुष्य प्राण्याच्या पुढील आयुःकमा बद्दलचे दूरदर्शित्व, व मोक्षसाधनाचा अट्टाहास, हे उपरी निर्दिष्ट सद्गुणांपकींच कांहीं आहेत; " वरील विवेचनावरून, हिंदुधर्मांतील चिवटपणा, हिंदुधर्माचे रहस्य, त्या धर्मातील कित्येक स्वयंभू व अमर असे सद्गुण, व त्या धर्माची महती, वगैरे गोष्ठी, हल्लींच्या काळी सुध्दा राज्यकर्त्या इंग्रज लोकांतीलच प्रसिद लेखक व विद्वान लोक मान्य करितात, हे उघड आहे. त्याप्रमाणेच चिरोड साहेबाच्या वरील व्याख्यानांतील कांहीं बायती संबंधानें पुष्कळच साधक बाधक विवेचन करितां येण्यासारखे आहे; परंतु स्थळाभावामुळे तसे करणे शक्य नाहीं; तथापि चिरोल साहेबानें कबूल केलेले हिंदुधमचि रहस्य, आणि मुख्यतः लाई मेस्टनचें समारोप करितांनाचे भाषण, मोठें मननीय, व हिंदुधर्माबद्दल योग्य आदर दर्शक व हिंदू लोकांनां अभिमानदर्शक असेंअसून, तें विशेषतः प्रत्येक हिंदू मनुष्याने लक्षांत ठेवण्यासारखेच आहे, असे म्हणण्यास हरकत नाहीं.

 "हिंदुस्थान " हा सर्व जगांतील अद्भुत देश आहे; सर्व जगाला आपणाकडे ओढून घेण्याची आकर्षण शक्ति या देशांत आहे; हिंदुस्थान ही एक जादू आहे; हिंदुस्थान, हा शब्द जगातील प्रत्येक देशाला माहिती आहे;