Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २३० )


व त्या काळात आर्य लोकांनी हिंदु समाजाचा अभेद्य व अत्यंत महत्वाचा गणला जाणारा पाया रचून काढिला हा दुसरा, होय. हिंदु समाजाची रचना त्यांनी अशा काही विशेष कुशलतेनें केली आहे की हिंदुस्थानांतील असंख्य लोक आपल्या पूर्वापार धर्म कल्पना कायम ठेवून आनंदानें त्या समाजात राहू शकतात; शिवाय त्याच रचनेमुळे आर्याच्या वर्चस्वासही बाघ येत नाहीं. अंतख भांडणा मुळे मौर्याची आणि गुप्त राजांची ज्या प्रमाणे वाताहत खाली स्याप्रमाण हिंदु धर्मामुळे बौद्ध धर्माची वाताहत झाली. हिंदु भूमीवर हिरव्या रंगाचें इस्लामी निशाण रोविले जाण्या पूर्वी हिंदी राजकारणात होणाऱ्या फेरबदलानुरूप हिंदु धर्माला वारा येईल त्याप्रमाणे पाठ देणे, जबरदस्ताशी अदबीने वागणे, वेळ प्रसंगी त्यांच्यायीं तादात्म्य होणें, बगैरे मार्गाचे अवलंबन करावे लागले व तेच मार्ग. पुढे सप्त शतकाच्या मुसलमानी अमलाखाली ही हिंदु धर्माला वागविण्यास कारणीभूत झाले. हिंदी ईश्वरबाद व तत्वज्ञान यावर इस्लामी छटा उमटली; परंतु इस्लामी अमला पेक्षाही ब्रिटिश अमलाने-तत्वतः हिंदी व इतर कोणत्याही लोकांच्या घर्मात ढवळा ढवळ करणार नाही अशी ग्वाही दिलेल्या ब्रिटिश अमलानें-हिंदूधर्मात पुष्कळच फेरबदल घडवून आणिला. एका हातति कुराण व दुसऱ्या हातात खंजीर घेऊन कढाई करणाऱ्या मुसल मानांपेक्षां ब्रिटिशांच्या सहानभूतीयुक्त औदासिन्यानेंच अधिक कामगिरी केली. एक शतकापूर्वी तर हिंदु धर्माचा डोलारा कोसळून त्या जागी ख्रिस्ती धर्माची व पाश्चात्य संस्कृतिची संस्थापना होणार असे इंग्रज लोकांना वाटू लागले होते, व या कल्पनेला पोषक अशा गोष्टीही घडून येऊ लागल्या होत्या; परंतु सत्तावन सालच्या बँड़ाने व त्याच्या बीं मोडामुळे उद्भुत झालेल्या वैमनस्यामुळे वरील आकांक्षा फोल ठरविल्या. हिंदुस्थानांतील निरनिराळ्या लोकांच्या विविध भाषा असल्यामुळे विचार विनिमयाला मोठाच अंतराय होता; तो अंतराव इंग्रजी भाषेनें दूर केला, व त्यामुळे सर्व सुशिक्षित हिंदी लोकांत एक राष्ट्रीयत्वाची कल्पना बाणली. ह्या एक राष्ट्रीयत्वाच्या कल्पनेचे बीज हिंदूंच्या धर्मग्रंथरूपों मंजुषेत होतें; कारण त्या कल्पनेमुळेच बौद्ध धर्माविरुद्ध ब्राह्मणांची मोहीम यशस्वी झाली होती. हिंदुस्थान देशांवर शंभर वर्षे राज्य करूनही इंग्रजांना हिंदुधर्माच्या चिवटपणाचे रहस्य अजून समजले नाही. हिंदुस्थानच्या सामाजिक व धार्मिक बटनेंत जरी पुष्कळ दोष असले तरी त्यांची बटना अशी कांहीं मनोश आहे की,