Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५)

पैकी पहिली जी टोळी युरोप खंडामध्ये जाऊन स्थाईक झाली, तिला 'आर्यन' अथवा ' इंडो-युरोपियन वर्गांपैकी 'केल्टिक ' शाखा असें म्हणतात. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी अशाच रीतीनें आर्य लोकांच्या दुसऱ्या दोन टोळ्या दोन दिशांनी पुन्हां युरोपखंडांत शिरल्या. त्यांपैकी एक इराण व आशिया मायनर या देशांमधून गेले, इतालियन, ग्रीक, आणि ट्यूटन या लोकांचे पूर्वज असून दुसरी म्हणजे कास्पियन समुद्राच्या उत्तरेकडून युरोपांत शिरलेली स्लाव्होनिक ही शाखा होय. कोल्टिक लोकानीं पश्चिम युरोपमधील मूळच्या अनार्य लोकांचा उच्छेद करून, व त्यांतील बहुतेक सर्व भागांत आपली वस्ती करून साम्राज्य स्थापन केली, आणि त्याच्या मागून आलेल्या ग्रेको-रोमन लोकांनी ग्रीस, इतालीतील काही भाग, भूमध्य समुद्रांतील बेटें, व त्यांचे किनाऱ्यावरील प्रदेश, यांमध्ये वस्ती करून त्यांनीही त्या ठिकाणीं आपलीं साम्राज्य स्थापन केली. या काली युरोपातील तत्कालीन सुधारणांचे जनकत्व पहिल्याने ग्रीस देशाकडे आले, परंतु वाढत्या सत्तेच्या अभावी तें लवकरच इताली देशाकडे गेलें, रोमन लोकांनी प्रथम इतालीत व नंतर उत्तर जर्मनी व रशिया, हे देश खेरीज करून बाकीच्या युरोपखंडात आणि आशिया मायनरमध्ये आपले विस्तृत साम्राज्य स्थापन केले; व उत्तर जर्मनींत बुटानिक लोकांनी, व रशिया आणि तुर्कस्थानांतील बऱ्याच भागांत स्लाव्होनिक लोकांनी बरती करून त्या त्या ठिकाणी आपआपली साम्राज्य स्थापन केली. त्याप्रमाणेच कांहीं आर्य लोक हिमालय पर्वत ओलांडून हिंदु- स्थानांत आले. यावेळी हिंदुस्थानातील मूळचे रहाणारे 'अनार्य' हे लोक होते; या अनार्य लोकांचा रंग काळा असून त्यांचीं नार्के चपटी व बसकर होतीं. मध्य हिंदुस्थानांतील भिल्ल, कोट, संताळ, जवांग, वगैरे जातीचे लोक हे या अनार्य लोकांचे वंशज होत. या काळी अनार्य लोकांच्या मानानें अधिक सुधारलेले असे ' द्राविडी ' या नांवाचे लोक हिंदुस्थानांत होते. हे लोक आर्य लोकांच्या पूर्वी, व त्यांच्याच प्रमाणे वायव्य दिशेनें हिंदुस्थानांत शिरले असावे, असा अजमास आहे. हे द्राविडी लोकही आर्य लोकांप्रमाणेच सुधारलेले होते; परंतु याच लोकांवर आर्यानी पुढे स्वारी करून त्यांना जिंकिलेले आहे. या आर्य लोकांनी ख्रिस्ती शकापूर्वी १८००० पासून पुढे हिंदुस्थानावर स्वारी केली. पहिल्याने ते हिंदुकुश पर्वताचे उत्तरेस वसाहती करून राहिले; परंतु इ० सना-