Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
( २२९ )


माहिती मिळवून हिंदुस्थानचे स्थैर्य हिंदूधर्मावर अवलंबून आहे, असे प्रतिपादन केलें; चिरोल साहेबाचे असे म्हणणे आहे कीं" अत्यंत पुरातन काळापासून हिंदुस्थान देश विशिष्ट प्रकारच्या संस्कृति बद्दल विख्यांत अन्न मुद्धां त्या देशाचा तत्कालीन इतिहास दंतकथा व पौराणिक कथांच्या अंधुक प्रकाशांतून नुकता अलीकडे दृग्गोचर होऊ लागावा, हे हिंदुस्थानासंबंधी ज्या अनेक आश्चर्य उत्पन्न करणा-या गोष्टी आहेत, त्यापैकींच एक होय. पाश्चात्य संस्कृतिचा उगम न्या देशांपासून झाला त्या देशांचा प्राचीन इतिहास जितपत विश्वसनीय आहे, तितपत मुद्धां हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास विश्वसनीय नाहीं. हिंदुस्थानच्या अनेक धार्मिक ग्रंथांतून हिंदुस्थानची धार्मिक व सामाजिक उत्क्रांत अनेक शतके कसकशी होत गेली याबद्दल माहिती आढळते. या ग्रंथांतून प्रतिपादिलेल्या धर्माला सर्व साधारण नांव हिंदुधर्म" असे आहे. न्त्रिस्त शकापूर्वी ६०० शे वर्षे हिंदुस्थानची अशी स्थिती होती; मध्य आशियातून आर्य लोक हिंदु- स्थानांत आले व त्यांनी पंजाब, व गंगेच्या आसमंतातील प्रदेश, व्यापिला. ह्या आर्यांनी तत्कालिन एकेश्वर व अनेकेश्वरवादी लोकांच्या धर्म समजुतीच्या जाळ्यांतूनच मुद्देसूद व सर्वव्यापी असे कायदे अथवा स्मृती तयार केल्या. धर्मगुरू व राजे यांची विदळ शासन पद्धति सुरक्षित राखण्याकडे या स्मृतींचा विशेष कटाक्ष होता; वेद ग्रंथांची भाषा सर्वांना समजण्या सारखी नसल्या- मुळे व संस्कृत भाषा केवळ ब्राह्मणा करितांच असल्यामुळे ब्राह्मणांचे इतर जातीं- वर वर्चस्व राहिले, जाती भेटाच्या सामाजिक तत्वांचाही है वर्चस्व कायम राखण्यास पाठिंबा मिळाला. जातिभेदाची जोपासना “ दैव यत्तं कुले जन्म " व जिवाच्या चौन्यांशी फेन्यांच्या कल्पनेवर झालेली होती. हिंदुधर्म विषयक कल्पनांच्या अभेद्य दुर्गावर बौद्ध धर्माने पहिला हल्ला चढविला. महंमदी स्वाय पूर्वी बौद्ध धर्माचा जिकडे तिकडे बोलवाला झाला, पण लवकरच त्या धर्माला उतरती कळाही लागली. ख्रिस्ती शका पूर्वीच्या तिसऱ्या शतकांत अशोकाच्या कारकीर्दीत बौद्ध धर्माची वाट शिखरास पोहोंचली, व गुप्त राजांच्या कारकीर्दीत बौद्ध धर्माचा -हास होऊन ब्राह्मणांना पूर्वीचे वर्चस्व प्राप्त झाले. खिस्ती शकाच्या चवथ्या किंवा पांचव्या शतकांत हिंदी संस्कृतीची वाढ झपाठ्याने होत होती.. हिंदुस्थानच्या त्या काळच्या इतिहासाचे दोन विशेष म्हटले म्हणजे, भर्यांना आपल्या राजकीय सत्तेला संघटित व व्यवस्थित स्वरूप देतां आलें नाहीं हा एक,