Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२२८ )


( Literary: History of India हैं पुस्तक पहा.) असे म्हटले आहे कीं, हिंदुस्थानावर मुसलमान लोकांनों एक सारख्या पांचशे वर्षे निकराच्या स्वाय करून आर्य सुधारणा मांगे हटविली आणि तजवर आपले वर्चस्व ही प्रस्था- पित केले; परंतु युरोपात नुसलमान लोकांनी जी गोष्ट घडवून आणिली तीच गोष्ट हिंदुस्थानांत त्यांना घडवून आणिता येणे शक्य नव्हते. कारण मुसलमान लोकांनी हिंदुस्थान देश पादाक्रांत केला. तथापि आर्य संस्कृतिवर त्या विज याचे वर्चस्व स्थापित झाले नाही. इतकेच नाही तर उलट मुसलमान लोकांनांच हिंदू लोकांनी पुष्कळसे आपाप्रमाणे बनविले. उलट पक्षी युरोपियन संस्कृति मुसलमानापेक्षा कमी दरजाची असल्यामुळे युरोपांत नुसलमानांना आपली छाप बसविता आली; परंतु तशीच छाप हिंदुस्थानात बसविणे त्यांना शक्य नव्हते. शिवाय, हिंदुस्थानांतील लोक निरनिराळ्या राष्ट्रांचे व धर्म पथचे असल्यामुळे आणि त्या सर्वांना एकाच छत्राखाली दावत ठेवणारी अशी एकच विशिष्ट सत्तासामुळे मुसलमानापासून हिंदू धर्माचा बचाव झाला. पूर्वी हिंदुस्थान देशांत बौद्ध धर्म चाल अस्तां त्या धर्माचा पाडाव होण्यास उशीर लागला नाहीं; याचे कारण असे होते की बौद्ध धर्मीय भिक्षू अविवाहित असत; त्यामुळे त्यांना ठार मारून त्यांचे विहार मोडल्या बरोबर वौद्ध धर्म संपुष्टांत "आला; परंतु हिंदू लोकांवर बौद्ध धर्मीय लोकांप्रमाणे प्रसंग आला नाहीं; व मुसल मान लोकांनी त्यांच्या अनेक देवालयाचा विध्वंस केला, मूर्तीचा भंग केला, मथुरा, कनोज, बनारस, सोमनाथ येथे ब्राह्मणांच्या कत्तली केल्या, हिंदुस्थानां- तील अपार संपत्ति घोर व गज्नी येयें मेली; तथापि सामाजिक आचार विचार, व संस्कृत वाङ्मय या बाबतीत हिंदूधर्माची पाळें मुळे अत्यंत खोल रुजली गेली असल्यामुळे त्यांना हिंदूधर्म नामशेष करिता आला नाहीं;
 अशा प्रकारच्या हिंदुधर्माबद्दल निरनिराळ्या प्रसिद्ध लेखकांनी आपापल्या ग्रंथात व व्याख्यानांत मननीय उद्गार काढिले असून, लंडन येथील “ सोसायटी ऑप् आर्ट" चे विद्यमानें चालणा-या व्याख्यानमालेत सर व्हॅलेंटाईन चिराल यांचे "हिंदूधर्मरहस्य या विषयावर लाई मेस्टन याच्या अध्यक्षतेखालीं नुकतंच ( माहे जुई, सन १९२० मध्ये ) एक व्याख्यान झाले. त्यावेळी चिरोल साहेबांन हिंदुस्थानाबद्दल, विशेषतः हिंदूधर्माबद्दल बरीच