Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २२४ )


तो उपदेश असा आहे की, "सत्य भाषणकर. धर्मा प्रमाणे वाग, अध्ययना विषय प्रमाद करूं नको. आपले कुशल व्हावे, यासाठीं कमें करण्या विषयीं प्रमादः करू नको. भूतमात्रा साठीं कर्मे करण्या विषय प्रमाद करू नको. स्वाध्याय क प्रवचन या विषय प्रमाद करू नको. देवकार्य व पितृकार्य या विषयों प्रमाद करू नको. मातेला देवां प्रमाणे समज. पित्याला देवा प्रमाणे समज आचार्याला देवा प्रमाणे समज. अतीथीला देवा प्रमाणे समज. जी कमें निंद्य नाहींत. त्यांचेच आचरण करावें; इतर कर्माचे आचरण करूं नये. आमची (गुरुंचीं ) जी सत्क में असतील, त्यांचेंच तूं आचरण करावेस; इतर कर्माचे आचरण करू नयेस. जे आमच्याहून श्रेउ ब्राह्मण असतील त्यांना आसन देऊन त्यांच्या श्रमाचा परिहार करावा. जे काहीं द्यावयाचें तें श्रद्धेनें द्यावें. अश्रद्धेने देऊं नये. मर्यादा युक्त द्यावें. भीतियुक्त द्यावें ओळख करून घेऊन द्यावें. ( अध्ययन पुरे झाल्यावर ) आचार्याला प्रिय असे धन देऊन गृहस्थाश्रमाचा उपभोग घे, अथवा घ्यावा. शिवाय ब्रह्मचर्य व्रताप्रमाणेच प्राचीन आर्यान एकपत्नी व्रताची ही महती वर्णन केलेली आहे, आणि प्राचीनकाळ बंधुप्रेम, सेव्य सेवक भाव, पतीव्रता धर्म, सत्य वचन, वगैरे उदात्त वात्रती प्रमाणेच, एक



  " सत्य बद । धर्मचर | स्वाध्यायमा प्रमदः । सत्यान्न प्रमदितव्यम् । धर्मान्न प्रमदितव्यम् । कुशलान्न प्रमदितव्यम् | भून प्रमदितव्यम् । स्वाध्याय प्रवचना भ्यां न प्रमदितव्यम् । देव पितृ कार्यायान प्रमदितव्यम् । मातृ देवो भव । पितृ देवो भव । आचार्च देवो भव । अतिथि देवो भव । यान्यन वद्यानि कर्माणि तानि सेवितव्यानि; नो इतराणि यान्यस्माक • सुचरितानि तानि त्वयोपास्यानि; नो इतराणि येके चारमा सो ब्राह्मणाः तेषां त्वया- ऽऽसनेन प्रश्वसि तव्यम् । श्रद्धया देयम् । अश्रद्धयादेवम् | त्रियादेयम् । हिया- देयम् । भियादेयम् । संविदादेयम् । आचार्याय प्रियं धनम हृत्य प्रजा तन्तुं मा यवच्छेत्सीः ॥

 वरील उपदेशांतील वाक्यांत " सत्यंवद म्हणजे (नेहमी ) सत्यभाषण. करीस जा, हेच पहिले वाक्य आहे, व या वरुन मुद्रा प्राचीन हिंदूलोक सत्याची किंती चाड बाळगीत होते, व सत्याचे त्यांना किसी महत्व वाटत होते, ही गोष्ट सहज लक्षात येण्या सारखी आहे.
"