Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २२३ )


दर्शविणारी अनेक उदाहरण हिंदूंच्या प्राचीन धर्म ग्रंथात व इतिहासात आढळ तात; मेघनाद म्हणजे रावणाचा मुलगा इंद्रजीत याचा पराभव करणारा योद्धा लक्ष्मण यानें सतत बारा वर्षे कायावाचामने करून कडकडित ब्रह्मचर्यव्रतांचे आचरण केले; त्या मुळेंच इंद्रजीताचा पराभव करण्याचे सामर्थ्य लक्ष्मणाच्या अंग प्राप्त झाले, असे रामायणांत दर्शविले आहे. भारतीय योद्धा भीष्म पितामह याने ब्रह्मचर्याच्या जोरावर काळास जिकिर्ले, व तो इच्छा मरण झाला, असे महाभारतांत वर्णन केले आहे. त्या प्रमाणेच मारुतीची कर्तृत्व शक्ती, ही, त्यास या व्रतामुळेच प्राप्त झाली होती. मारूती हा ब्रह्मचारी असल्यामुळे स्त्रिया त्याची पूजा करोत नाहींत, तरी सुद्धां मारुतीची देवालयें कन्याकुमारी पासून हिमालयापर्यंत पसरलेली आहेत. ती शोभायमान अर्शी बांधिलेली क्वचित्च दृष्टीस पडतात; तथापि दक्षिण हिंदुस्थानांत बहुधा असे एकही खेडें सुद्धां आढळणार नाहीं, की जेथे मातीचे निदान एक तरी देवालय अस्तित्वात नाहों, इतकेच नव्हे तर कित्येक खेड्यांत मारूतीची एकाहून अधिक देवालवेदी अस्तित्वांत असलेली आढळतात. महाराष्ट्रांत श्री समर्थ रामदास सामीने रामभक्तीचा महिमा वाढविल्यावर मारूतीच्या उपा- सनेस जोराचं चलन मिळालें, व जागोजाग मारुतीची देवालये स्थापन झाली. हे दैवत युद्ध प्रीय मराठ्यांना फार प्र.य व पूज्य वाटू लागले, आणि छत्रपती शिवाजी महाराजाने ज्या ज्या ठिकाणी स्वराज्याच्या बंदोबस्ताकरिता कोट, दुर्ग, व गड, बांधिले, तेथे तेथे त्यांच्या महाद्वाराशी बलमीन मारुतीराय हातांत गदा घेऊन उभा असलेला दृष्टीस पडूं लागला. आणि सदा विजयी, सदा ब्रह्मचारी, सदा सामर्थ्यवान, सदा स्वामिसेवातत्पर, सदा राजनिष्ट व कर्तव्य निष्ट असा हा श्रीरामदूत लष्करी बाण्याच्या मराठे वीरांनी अनुकरणीय व वंच म्हणून आपल्या सन्निध त्याची स्थापना करून त्याचा आश्रय केला; उपनिषदकलींही ब्रह्मचर्यत्रतासंबंधाने जनतेंत अत्यंत आदरभाव वसत असे; आणि गुरुगृहीं अस्तांना व उपनयनाच्या वेळीं महामंत्रोपदेश झाल्यावर गुरू कडून ब्रह्मचान्यास जो उपदेश करण्यांत येत असे तो विशेष महत्वाचा व मननीय असे; या उपदेशाचा मासला म्हणून, तैत्तिरीयोपनिषदां- तील खालील वचनें या ठिकाणी ग्रंथित केली असून त्यांचे विद्यार्थी दशेतील प्रत्येक स्त्री पुरुषांनीं पूर्णपणे मनन करून त्याप्रमाण आचरण ठेवणे योग्य आहे;