Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२२५ )


पत्नित्वांची व कडकडीत नैतिक आचरणाची योग्यता समाजास पूर्णपणे कळ- लेली होती, असे रामायण, व महाभारत बगैरे ग्रंथावरून येते; सारांश, हींच्या काळ, प्राचीन स्त्री पुरुषाप्रमाणे, अविवाहित स्त्री पुरुषांनी कडकडीत ब्रह्मचर्य व्रत व विवाहित पुरुषांनी कडकंडित व संयमित एक पत्नि व्रत व नैतिक आचरण ठेविल्यास त्यांची दरीर संपत्ति निर्दोष व सुदृढ राहून जगांत त्यांना सुखानें कालक्रमणा करिता येईल, वः भावी पिढी तेजयुक्त निर्माण होऊन ती आपल्या कर्तुत्व शक्तीनें देशसेवा करण्यास व प्राचीन आर्यांची तेजस्त्रिता कायम राखण्यास कारणीभूत होईल, असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही.  प्राचीन रीमन लोकांनी निरनिराळ्या देशांतून वसाहती करितांना तेथील लोकांच्या देवतांना व रुणांना आपल्या देवाच्या पंचायतनांत व पंचांगांत प्रविष्ट करून घेउन लोक संग्रहाच्या तत्वास मान दिला, तसांच प्रकार अनार्थ जातीच्या संबंधांत आमच्या अर्थ पूर्वजांनी केलेला आहे; आणि प्राचीन हिंदू लोकांनी बदलत्या परिस्थितीशी आपले विचार व वर्तन जुळवून घेतले असल्यामुळेच हिंदूधर्मजित व सतेज राहिला आहे; अकराव्या शतकांत प्रसिद्ध अल्युरेनी उर्फ अबूरेहेन हा रूच येथील विद्वान प्रव.सी हिंदु- स्थानात आला होता; त्यावेळी त्याने हिंदू लोकांच्या आचार विचाराचें, व त्यांच्या सामाजिक व राजकीय स्थितीचे विवेचन केले आहे, त्यांत ही त्यानें हिंदूधर्म व हिंदू लोक याबद्दल प्रशंसनीय उद्गार काढिले आहेत; हिंदू लोकांतील मूर्ति पूजेच ही असेंच रहस्य असून त्यामुळेच हिंदू समा जाची इतर कित्येक बाबतींत ही प्रगती झालेली अहे; कारण शिल्प शास्त्र, गायन कला, वाचकली, कवित्व, व दगड़ आणि धातू यांच्या मूर्ती बन- विण्याची कला, वगैरेंची कदाचित उत्पत्ति नसली तरी वृद्धी होण्यास मूर्ति पूजाच कारणी भूत झाली आहे, असे म्हणतां येईल; भुवनेश्वर, केतेश्वर वगैरे देव स्थानाचे बांधकाम पाहून हल्लींच्या काळी देखील निष्णात शिल्प शास्त्रज्ञ आश्चर्य चकित होतात; त्याच तोडीची सोमनाथ, बैलूर, कांची, मदुरा, श्र. रंगम्, तंजावर, गिरनार, जगन्नाथ पुरी, हंपी, घंटसाल, वगैरे टिकाणची प्रसिद्ध देवस्थानें अस्तित्वात आहेत. त्याप्रमाणेच देवतांच्या मूर्ती लहान व अतीशय मे. ठ्या, अशा ही असत; ह्यू- एन-त्संग हा चिनी प्रवासी काशी येथे गेला होता, त्यावेळी
 १५