Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २२२ )


त्याचीच एकनिष्टपणें सेवा करणारा एकांतिन श्रेष्ट भक्त होय असे म्हट- लेले आहे; या वासुदेव धर्माचे अनुयायी भागवत धर्मी म्हणून ओळखले जातात; मेगास्थनीसच्या ग्रंथांत त्याने त्या काळात वासुदेवाची ( म्हणजे वासुदेव - कृष्णाची ) पूजा लोकांत रूढ असल्याचे दिग्दर्शन केलेले असून ख्रिस्ती शकाच्या चवथ्या शतकांतील गुप्त वंशाच्या राज्यकर्त्यांच्या नाण्यावर " परम भागवताः " अशी अक्षरे आहेत; या भागवत धर्माचे रहस्य महन असून श्रीकृष्णानें, अर्जुनाचा मोह दूर करून त्याला कर्तव्य कर्म करण्यास प्रवृत्त करिताला, धर्म, अर्थ, काम, व मोक्ष, हे चतुर्बिंध पुरुषार्थ साधून देणारा जो उपदेश केला, त्यांत मानवी ध्येय काय असावे, याबद्दल मोठे मार्मिक व मननीय विवेचन केले आहे; तें असें:-" मनुष्यानें आपल्या खऱ्या स्थितीचे ज्ञान करून घेतले पाहिजे. त्यानें निरिच्छपणे आपली कर्तव्य कर्मों केली पाहिजेत, व कर्माचरणाच्या असंख्य दोषां पासून मुक्त राहण्यास्तव त्याने आपले अंतःकरण शुद्ध ठेवून, अनन्य भावानें परमेश्वराला शरणागत झाले पाहिजे. त्याने आपले मन ताब्यांत ठेवून निष्काम कर्म करावें, भक्तीनें परमेश्वरास प्राप्त करून घ्यावे, व ज्ञानाच्या योगानें परम श्रेष्ठ, परम अक्षर, व कधींही विकार न पावणाऱ्या ब्रह्मांत मिळून जावें, हाच मनुष्याचा तरणोपाय असून परमात्मस्वरूपी लय पावणें हेच त्याचें अंतिम ध्येय आहे; ” त्या प्रमाणे याच हिंदू धर्मातील आर्याच्या प्राचीन ग्रंथांत ब्रह्मचर्य व्रत व एक पत्नी व्रत या विषयों ही मोठें मननीय वर्णन केलेले आहे; आणि मानवी प्राण्यांतील पुरुषार्थाचे मूळ, सद्गुण व सामर्थ्य वगैरेंचा उगम, ब्रह्मचर्य व्रत आचरिल्या पासून होतो, अर्से दिग्दर्शित केलेले आहे. प्राचीन आर्य लोकांना ब्रह्मचर्याचे महत्व पूर्णपणे माहिती असून या बतानें शरीर सामर्थ्याची वृद्धी होते, असे प्राचीन हिंदू लोक समजत असद; म्हणून पूर्वकालीन अनुशासनकारांनी असा नियम ठरवून दिला की, मनुष्यानें आपल्या आयुष्याचे तीन भाग ब्रह्मचर्या बस्थेंत काढावे, व एकच भाग गृहस्थाश्रमांत, आणि तोही संयमन पूर्वक विषयांचा उपभोग घेण्यांत खर्च करावा; म्हणजे मनुष्याने आपल्या आयुष्याची पहिली पंचवीस व ब्रह्मचर्यात काढाव; पुढे पंचवीस वर्षे प्रापंचिक या नात्याने पत्नीच्या संयमनपूर्वक सेवनांत व प्रपंचात घालवावी व त्या पुढील पचवीस वर्षे वानप्रस्थ व सन्यास या अवस्थेत घालवावी. ब्रह्मचर्याचे महत्व