Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ण्यास पुरेसा आहे, असे ते म्हणतात, वाममार्गांचे अनुयायी जात किंवा वर्णभेद पाळीत नाहींत. भैरवी चक्राची पूजा चालू असतां तर सब गोलंकार होत असतो. वारांगना रजस्वला स्त्री, महारीण, मांगीण, यांचे उच्छिष्ट सेवन करणे म्हणजे तीर्थांचे दर्शन घेण्याइतकें पवित्र व पुण्यकारक आहे, असे त्यांचे मत आहे. असा हा भयंकर सांप्रदाय बंगाल, नेपाळ, काश्मीर, द्रविड, मलवार, महाराष्ट्र व कर्नाटक या प्रांतांत कमी अधिक प्रमाणांत चा आहे. शाक्तांचे बीभत्स, क्रूर, व किळसवाणे, पूजा विधी सरकारी कायद्याच्या भीतीमुळे गुप्तपणे चाललेले असतात. या उपासकांत ब्राम्हण, क्षत्रीय, वैश्य व शूद्र, आणि काहीं म्लेछांचा भरणा असून ते मंत्र सामर्थ्याच्या योगानें आपण अद्भुत कृत्ये करू, असे सांगतांत; व फसवेगिरीच्या धंद्यावर निर्वाद करितात. बंगाल प्रांतांतील ओझे ब्राह्मण भयंकर शाक्त आहेत. “ कलॉ चंडि विनायकौ; चतुर्वर्गाय चंडिका: असे ते सांगतात. ( ऋग्वेदीकृत आर्याच्या सणाचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास, पान २७० ते २७२ पहा. )
 या उपरी निर्दिष्ट शाक्त पंथाच्या अगदर्दी उलट व हिंदू धर्मास घरून असा वासुदेव पंथ ( अथवा वासुदेव धर्म ) एकेकाळी हिंदुस्थानात प्रचलीत होता; पंचरात्र सिद्धांत हा सर्व वेंदांचा निष्कर्ष असून " चित्रशिखंडी " या अभिधानानें विख्यात असलेल्या सतपींनी या उत्तम शास्त्राची रचना केली आहे; हा प्रवृत्ति व निवृत्ति या दोन्हीं मार्गांचा परिपोषक असून तो सिद्धांत नारदानें पृथ्वीवर प्रचलीत केला, असे शांतिपर्वात सांगितले आहे. पंचरात्र सिद्धांत हाच परमात प्राप्तीचा सोपा उपाय असून त्यालाच " वासुदेव घर्म ” असे नांव देता येईल. ज्या वेळीं ब्रह्मा, विष्णु, व शिव यांची पूजा रूढ झाली नव्हती, त्यावेळी वासुदेव हा परमपूज्य मानून त्याचीच भक्ती सर्व लोक करीत असत; महाभारतकाल यज्ञयाग व हिंसा यांच्याबद्दल अनुकूल मत नव्हते, अशा वेळीं भक्तिप्रधान एकेश्वरी वासुदेवधर्म वाढत गेला. पातंजली, पाणिनी, वगैरे प्राचीन लेखकांच्या काळीं वासुदेव हें परम श्रेष्ट दैवत असल्याचें लोक मानीत असत; निवृत्ति व निष्काम भक्ती हीं वासुदेव धर्माची मुख्य अंगे आहेत, तरी प्रवृत्ति, मार्गात राहून निवृत्तपर वर्टन ठेवणे हेच योग्य असल्याचे त्यांत सांगि आहे. श्रीकृष्ण नेंही गीतेंत वासुदेव भक्ति सांप्रदायाची महती वर्णन केलेली आहे, आणि सर्व प्रकारें बासुदेवास शरण जाऊन तनमनधनें करून