Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २२० )


पटले, मंत्र, सहस्त्रनाम, पद्धति, नीजें, कवचें, न्यास, मुद्रा, होम, बली, वगैरे “अनेक विधी आहेत. हिंदू धर्मात निंद्य मानिलेल्या मद्यमांसा शिवाय हे विधी " पूर्ण होत नाहींत; तांत्रिक मतास अनुसरून कोणी उत्पन्न केलेलें देवी माहात्म्य हा ग्रंथ प्रमाण मानून त्याचे पठण व श्रवण, सप्तशतीचा चंडिपाठ, हीं कृत्ये नवरात्रीत करण्यांत येतात. ह्या माहात्म्यांतील रुधिराध्याय हा तर क्रूर प्रवृत्तिची परमावधी दर्शवीत आहे. शाक्तांनी आपल्या कल्पित देवामध्यें अनेक भैरव असल्याचें मानिले असून त्यांच्या अनेक देवी किंवा भैरवीही कल्पिल्या आहेत. शाक्त लोक स्त्रियांस शक्ती व पुरुषांना वीर किंवा भैरव म्हणतात, व प्रत्यक्ष स्त्रीची पूजा अश्लील विधीनें करीत असतात; देवीची कृपा संपादन करण्यासाठी कित्येक मोठीं उग्र अनुष्टानें करावयाची असतात, प्रेतावर आसन मांडून बसणें हाडां- दातांच्या माळा घालणें, वगैरे विर्धीच वर्णन करणेही अयोग्य आहे. तांत्रिकांची काल गणना, पंचांग, श्राद्ध, अंत्येष्टि वगैरे सर्व विधी वैदिकांच्या पद्धतीहून भिन्न आहेत; त्याच्यांत यंत्रे पुष्कळ असून त्यांत श्रीचक्र है श्रेष्ट आहे; हीं यंत्रे शालिग्राम शिलेवर, भूर्जपत्रावर, किंवा स्फटिकावर तयार केलेली असतात; तीं काशी व काश्मीर येथे मिळतात; त्यांच्या धारणानें आधिव्याधि नाहींशा होऊन सर्व मन कामना सिद्ध होतात, असे मानणारे हिंदू थोडे थोडके नाहींत, जे या मताचे नाहीत त्यास कंटक किंवा पशु ही संज्ञा दिलेली असते; व जे त्यांत नव्यानें प्रवेश करितात त्यांस पूर्णाभिषेक किंचा पट्टाभिषेक करण्यांत येतो. सर्व तांत्रिक लोक आपल्या अंगी अद्भुत सामर्थ्य असल्याचे सांगतात. जारण मारण, उच्चाटण, शत्रुनाश, वशिकरण, मोहन सैन्य स्तंभन, मेघ स्तंभन, बुद्धि स्तंभन, सर्प निवारण, रोग निवारण, वगैरे अद्भुत कृत्ये आपण करूं शकतो असे शक्त्युपासक सांगत असल्यामुळे त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून कित्येक भाविक व भोळे लोक आपल्या जन्माचे मातेरें करून घेतात. शक्ति- पूजेप्रीत्यर्थ भरवी चक्र उत्पन्न करण्याची कृति महाभैरव जो शिव त्यासंबंधों केल्या जाणान्या लिंगपूजेवरून निघाली है निर्विवाद आहे. यासंबंधाचे विशेष स्पष्टि- करण शिष्ट संमत होणार नाही म्हणून ते केलेले नाहीं; एकंदरींत शाक्त मत, बेदास,सामाजिक नीतीस, किंवा मुविचारास, धरून नाहीं, असे विचारी जनांचे मत आहे. शात यावरून आलेला छाकटा हा शत्रू या पंथाचे हीनत्व दर्शवि-