Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४ )

काळास ' तमोयुग' आणि त्या वेळेपासूनच्या काळास 'मध्ययुग ' भ मानण्याचा प्रघात आहे; तथापि वास्तविक रीत्या मॅक्सिमीलियन (इ. सन १४९३ ते १५१८ ) हाच अर्वाचीन काल आणि मध्यकाल यांचे मधील बादशहा होय, असें ह्मणतां येईल. याच कालांत संस्थानिक राज्यपद्धति आणि सरदारी राज्यपद्धति सुरू झाली. सोळाव्या शतकाच्या प्रारंभी मध्ययुगाचा शेवट झाला; त्यामुळें तत्कालिन उपरिनिर्दिष्ट दोन्हीं पद्धति, धर्मयुद्धे, व धर्मगुरूंचे महत्त्व, यांना आळा बसला; आणि संक्रमण स्थितीला सुरवात होऊन नवीन युगास प्रारंभ झाला, व या युगांतील जनतेमध्ये विद्या, कला, विचार- शक्ति आणि ज्ञान यांवें बीजारोपण झालें.
 युरोप खंडाप्रमाणे आशिया खंडांतील हिंदुस्थान देशाचेही कालमानाप्रमाणे निरनिराळे भाग पडतात. ते म्हणजे, 'प्राचीनकाल, वेदकाल, ब्राह्मण- काल, ' ' बौद्धकाल, ' व 'हिंदूकाल, व त्यानंतर मुसलमानीकाल – हे होत. त्यांपैकीं अज्ञात कालापासून इ. सनापूर्वी १५०० पर्यंतच्या कालास 'प्राचीनकाल, इ. सनापूर्वी १५०० पासून इ. सनापूर्वी १००० पर्यंतच्या कालास ' वेदकाल, ' त्या वेळेपासून इ. सनापूर्वी ५५० पर्यंतच्या कालात ब्राह्मण- काल' इ. सनापूर्वी ५५० पासून इ. सन ३०० पर्यंत 'बौद्धकाल, ' व इ. सन ३०० पासून इ. सन १००० पर्यंतच्या काळास हिंदू काल ' असे म्हणतात.
 जगाच्या इतिहासांत, अति प्राचीन कालापासून चीन, मिसर व हिंदु- स्थान, हे देश सुधारणेविषयीं प्रसिद्ध आहेत आणि अति प्राचीन कालापासूनच हिंदुस्थान देशाशीं युरोपखंडाचे व्यापारी दळण वळण चालू असून हिंदुस्थान देशाला ऐतिहासिक व सांपत्तिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. शिवाय, या देशांत पूर्वी मोठमोठे योद्धे, राज्यकर्ते, धर्मसंस्थापक, विद्वान व पंडित मंडळ, धर्मशास्त्र- विशारद, व साधुसंत मंडळ, निर्माण होऊन गेलेले आहेत. मानुजकोटिशास्त्र- वेत्त्यांच्या मताप्रमाणे मानवी प्राण्यांचे पांच वर्ग कल्पिले असून त्यांपैकीं संख्येनें सर्वांत मोठा वर्ग, झणून आर्य लोकांची गणना केलेली आहे. आर्यांचे मूळ वसतिस्थान मध्य आशियांत असून भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरही त्यांच्या वसाहती होत्या. या मूळ वसतिस्थानांमधूनच आर्यलोक हे पुढे चोहों- कडे पसरले. या कांहींनी इराणांत वसाहत केली; कांहीं युरोपखंडांत गेले; व कांहीं हिमालय पर्वताचे घाट ओलांडून हिंदुस्थानांत शिरले. या आर्य लोकां--