Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २१९ )


बाद, ईश्वरवाद, अनीश्वरवाद, आत्मानात्मवाद, आद्यनादिवाद, तकवाद, शुद्धाद्वैतवाद, विशिष्टाद्वैतवाद, मुगुणनिर्गुणवाद, वगैरे अनेक प्रकारचे वाद, प्रसिध्द असून शेष, वैष्णव, लिंगायत, रामानंदी, कबीरपंथी, श्री सांप्रदायी, गाणपत्य, शाक्त, सौर वल्लभपंथी, दादूपंथी, उदासी, सत्नामी, रामस्नेही, जोगी, नागपंथी, अवधूत, प्राणामी, बिजमार्गी, जैन, सत्संगी महानुभावी, वारकरी, गोसावी, साधू. मलुकदासी, रामदासी, अधोरी, वाममार्गी, पाशुपत, प्रवृत्तिमार्गी, निवृत्तिमार्गी, कौलिक, अवधूतमार्गी, अग्निहोत्री, भागवत, हरव्यासी, कंटिवाले, परमहंस, सरभंगी, लाकूलिन, कालामुख, कपाल, बगैरे अनेक वाद, पंथ, व सांप्रदाय, हिंदुस्थानांत चालू असून त्यांतही पुन्हां अनेक उपभेद आहेत; उदाहरणार्थ, गाणपत्य पंथ; या पंथांतही, महागणपती पंथ, हरिद्रा गणपती पंथ, उच्छिष्ट गणपती पंथ, नवनीत गणपती पंथ, स्वर्ण गणपती पंथ, व संतान गणपती पंथ, असे सहा भेद आहेत; त्या प्रमाणेच कांहीं पंथांत चमत्कारिक आचार, विचार, व रुढी, प्रचलित आहेत; उदाहरणार्थ, शाक्त पंथा संबंधी त्रोटक माहिती, आर्याच्या सणाच्या इतिहासांत दिली आहे; त्यावरून असे कळते कीं, शाक्त पंथांत दोन पक्ष आहेत; एका पक्षाचे लोक सात्विक पद्धतीने शक्तीचे अर्चन करीत असून तिचें स्वरूपही शांत व प्रेमळ असल्याचे मानितात. हा पंथ दक्षिण मार्गी, उत्तर कौलिक, समयिन, वगैरे नांवांनी प्रसिध्द आहे. दुसऱ्या मतास तंत्र मार्ग, आगम, मंत्रशास्त्र, पूर्व कॉल, वाम मार्ग, उपासना, वगैरे नांवे असून यांचे शक्तयुपासनेचे विधी अवैदिक व खऱ्या आर्य धर्मास असम्मत आहेत. या पंथाची स्थापना नाथजोगी या नांवाच्या एका इसमाने केली; त्यानें त्या संबंधी शिवपार्वती संवाद रूप अनेक ग्रंथ लिहिले, त्यास “ तंत्र "असें म्हणतात. त्यांत पूजा, न्यास, मुद्रा, बीजाचे मंत्र, वगैरे अनेक विधी लिहिलेले असून त्यांच्या देवतांस दशमहाविद्या असें म्हणतात; या देवांची नांवें पुढील प्रमाणें आहेत: - १ श्याम ( काळी ) २ तारा ३ त्रिपुरा ४ बगलामुखी, ५ छिन मस्तका, ६ मातंगी, ७ धूमावती ८ भैरवी, ९ महाविद्या, व १० भुवनेश्वरी; या शिवाय तिच्या गुणवैशिष्यामुळे व तिनें निरनिराळ्या कारणाकरिता घेत- .लेल्या अवतारामुळे त्रिपुर सुंदरी, ललिता, शांता, दुर्गा, महिषासुर मर्दिनी, चंडी, चामुंडी, वगैरे अनेक नावाने ती प्रसिद्ध झाली आहे; त्यांची पूजा,