Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २१७ )


कांहीं ब्राह्मणांनी या भिक्षु मुळेच पुन्हा पुन्हां आपणास प्रवासांत विघ्न उत्पन्न होते असे मानून त्याला मध्येच कोटें तरी एखाद्या बेटावर टाकून देऊन पुढे जाण्याचा बेत केला, असे फॅ-एन याने आपल्या प्रवासवर्णनांत लिहिले आहे; त्यावरून, त्याकालांत जावा बेटांमध्ये ब्राह्मणांची वसाहत होती, आणि ब्राह्मण लोक दूरदूरच्या प्रदेशांत जलपर्यटण करीत असून खुद्द त्याच्या बरोबरील लांबच्या प्रवासातही ते त्याच नॉकेमध्यें होते, ही गोष्ट सिद्ध होते; त्याप्रमाणेच सुमात्रा बेटातही हिंदूलोकांची वसाहत असून त्यासंबंध ( थिऑसॉफिस्ट या मासिक पुस्तकांतील मि. नरसिंह याच्या लेखावरून ) अशी माहिती मिळते कीं हिंदुस्थानच्या द्वीप समूहामध्ये जावा बेटाचे जितके महत्व आहे तितकेंच सुमात्रा बेटाचेंही आहे. जावा, सुमात्रा, बोर्निओ, सेलिबीज व ‘संबावा, या बेटांची नांवें अनुक्रमें यव सुमित्र, भरणी, शलभा, आणि संबभ या संस्कृत शब्दांप सून झालेली आहेत. हिंदुस्थानांतून तिकडे वसाहत करण्यासाठी जी मंडळी बाहेर निघाली तिचा सुमित्र या नावाचा एक नायक होता, व त्याच्याच नावावरून यापैकी एका वेटाचे नांव सुमात्रा असे पडले असावें. या बेटांतील अचीन या नावाचे शहर व त्याच नावाने प्रसिद्ध अस लेला पश्चिमेकडील प्रांत हे मुनित्र या संज्ञेनेच पूर्वी ओळखले जात असत. प्राचीन काळी सुमित्र हे शहर या बेटाची राजधानी होती; व त्याचे अवशिष्ट भाग अद्यापि पाहण्यास सांपडतात. या बेटांत चिंचेची झाडे पुष्कळ असून त्यावर वानरांचे कळप नेहमी वस्ती करून रहात असत; या वरून तेथील लोकांची अशी समजूत झाली आहे की रामायणांत किष्किंधा या नावाने प्रसिद्ध असलेले स्थळ म्हटले म्हणजे हॅच वेट होय; आणि या ठिकाणीं वाली व सुग्रीव यांची राहण्याची जागा अनूक असावी, असे ते दाखवितात. सुमात्रा बेटाची जास्तीत जास्त लांबी १०४७ मैल व रुंदी ३३० मैल आहे, व एकंदर क्षेत्रफळ १ लक्ष ६९ हजार ६१२ मैल आहे. या बेटांतील लोकवस्ती अगदीं पातळ आहे; येथील लोकसंख्या सुमारे ३५ लक्ष आहे. येथील प्रदेश डोंगराळ असून त्यांत इंद्रजित, हरि, पाणी, शक, वगैरे नांवांच्या नद्या उगम पावतात. शिवाय ज्वालामुखी पर्वत व सरोवरेंही तेथे आहेत. सरोवरांची नांवें मणंद्रि, शंकर, अशी आहेत. या ठिकाणचे नूळचे लोक नरमांस भक्षक असल्यामुळे