Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २१६)


होती; आणि वेदांत या देवतेची अतीशय स्तुती केलेली असून वेदकालांतही लोक व्यापार करीत असत असे दिसते; कारण ऋग्वेदाच्या चवथ्या मंड- •ळांतील ५६ व्या सूक्तांत " संपत्ति मिळविण्याची हांव धरणारे व्यापारी उष्ण निश्वास टाकणाऱ्या नौकेवर आरूढ होऊन सफर करण्यासाठी समुद्र मार्ग मोकळा करितात, असा आणि त्याप्रमाणेच याच वेदांत इतरत्र ( १-४-३ ) " धन मिळवूं इच्छिणारे वाणी लोक जल पर्यटणाकरितां तयार करून ठेविलेल्या नौकांची आराधना करीत आहेत, " असा उल्लेख आढळतो. त्यावरून, व मॅगेस्थनीस यानें आपल्या प्रवास वृत्तांत त्याकाळी व्यापारा संबंधानें प्रसिद्ध असलेल्या बंद रांची जी माहिती दिली आहे, तिजवरून हिंदू लोक त्याकाळीं ही समुद्र मार्गाने परदेशाशीं व्यापार करीत असत, हे उबड होतें. सोकात्रा बेटांस पूर्वी डायस कोरडीज हैं ग्रीक नांव असें; त्याप्रमाणेच सिलोन बेटांस ताप्रोबेन हें नाव असून येथील लोक आपल्या देशांतील अरण्यांतून हत्ती पकडून तें पूर्व किनाऱ्यावरील कलिंग देशाच्या राजकर्त्यास जलमार्गाने नेऊन विकीत असत, असा उल्लेख आढळतो; म्हणजे हत्तीस वाहून नेण्यासारख्या प्रचंड नौकाही त्या काळांत तयार होत असत असे दिसतें; इ० सनापूर्वी ५० वर्षे या काळांत, सिलोन वेट मगध देशाच्या विजय या नांवाच्या राज्यकर्त्याने आपल्या हस्तगत करून घेतले व या ठिकाण हिंदू लोकांनी वसाहत केली; राजतरंगिणी या ग्रंथांत जयधीर राजानें सिलोन बेटांत आपला एक वकील पाठविल्याचे जे वर्णन केलेले आहे, तें हेंच बेट " असून या गोष्टीवरूनही, हिंदूलोक अजमासे निदान अडीच हजार वर्षांपूर्वीपासून जलपर्यटण करीत असत, हे उघड होत. हिंदुलोकांच्या वसाहतीसंबंधाने पाहतां त्यांनी इसवी सनाच्या ७८ व्या वर्षी जाया बेटांत वसाहत केली असून त्यापूर्वीच त्यांनी मुमात्रा बेटांतही वसाहत केली होती. इ. सन ४०० च्या सुमारास चीन देशांतील प्रसिद्ध प्रवासी व भिक्षु फा-एन हा मिलोन बेटांत येऊन तेथून काहीं बोडधर्मीय ग्रंथ गोळा करून स्वदेशी परत जाण्यासाठी जहाजांतून निघाला; परंतु रस्त्यांत समुद्रात वादळ झाल्यामुळे त्यास मध्यंतरी जावा बेटांत उतरण भाग पडले; त्यावेळी तेथें वसाहत करून राहिलेले अनेक ब्राह्मण त्याच्या दृष्टीस पडले; तो त्या बेटांत कांहीं महिने राहिला, त्या नंतर त्याने पुन्हां चीन देशांत जाण्यासाठी जलमार्गाने प्रवास करण्यास सुरवात केली तथापि पुन्हां समुद्रांत वादळ होऊन जहाज बुडण्याच्या बेतात आले; तेव्हा जहाजावरील