Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २१५ )


" संख्या पद्धति " (Notstion System ) ही अतीशय महत्वाची असून ती पहिल्यानें हिंदू लोकांनी प्रचारांत आणिली; त्या नंतर पर्शिया (इराण) देशानें ती घेऊन आपल्या देशांत सुरू केली; व तेथील राज्यकर्ता प्रसिद्ध बेहराम यानें हिंदू गवई ही आपल्या दरबारांत आणून ठेविले; त्या नंतर अरब लोकांनी ही पद्धति स्वीकारिली, व नंतर अकराव्या शतकाच्या सुरवातीस गुईदोदी अरेझो यानें ती युरोपांत नेऊन नंतर तिचा सर्व युरोपखंडाभर प्रसार झाला.
 व्यापार विषयक बाबती संबंधानें पाहतां, हिंदुस्थानवासियांचा, वास्तवीक म्हणावयाचे म्हणजे, हल्लींच्या काळीं जगांतील व्यापारांत फारसा हात नाहीं; तथापि पूर्वकाळीं युरोप, आशिया, आणि आफ्रिका, या खंडांबरोबर खुष्की व जलमार्गाने चालणाऱ्या व्यापाराचे ते धनी होते. ते स्वतः जहाजे बांधीत असत; समुद्र पर्यटण करीत असत; आणि जमीन व पाणी यापैकी कोणत्याही मार्गाने चालणाऱ्या अंतर्राष्ट्रीय व्यापाराच्या सर्व दोया त्यांच्याच हातीं असत; प्रजेतील संपत्तीची विपुलता, देशांतील जमीनीची अनुपमेय सुपिकता, आणि निरनिराळ्या प्रकारच्या व्यापारी मालाची, व कला कौशल्याच्या कामाची पैदास, यामुळे या व्यापाराची त्याकाळी अत्यंत वाढ व भरभराट झाली होती; जहाजे बांधून त्या साधनांनीं ते जल व्यापार करीत होते; व प्रोफेसर मॅक्स डंकर याच्या म्हणण्या प्रमाणें अजमासें इ० सनापूर्वी दोन हजार वर्षांपासूनच प्राचीन हिंदुस्थानांत जहाजे बांधण्याची कला अवगत होती. व्यापाराप्रमाणेच, जगाच्या निरनिराळ्या भागांत त्यांनीं वसाइतोही स्थापन केल्या होत्या; व या वसाहती विषयक बाबतींत, इजित इथिओपिया, इराण, तुर्कस्थान, व उत्तर आशिया- • सैबेरिया प्रांतातील बजरापूर-स्कँडिनेव्हिया, पूर्व आशिया, ब्रह्मदेश, मार्ता- बानचें आखात, कंबोडिया आणि कोचीन चीन, सयाम, जावा, बोर्निभ सेलबीज, सुमात्रा, आस्त्रेलिया, चीन, जपान आणि अमेरिका, वगैरे देशाशीं, त्यांचा कोणत्याना कोणत्या रूपाने प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध आलेला होता; या संबंधीं पुष्कळच खुलासेवार, माहितीपूर्ण, व मनोरंजक, हकीकत देतां येण्यासारखी आहे; परंतु स्थलाभावामुळे या ठिकाणीं त्रोटकपणे महत्वाच्या अनेक गोष्टीपैकों दोनच गोष्टींचा फक्त उल्लेख केला आहे; प्राचीन आर्य लोकात इतर अनेक देवताप्रमाणेच वरुण ( Ursnas ) या नांवाची एक देवता प्रधान मानिलेखी