Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २१४ )


द्वार हे शकुना संबंधीचे ग्रंथ एका जैन लेखकानें निर्माण करून त्या विद्येच्या प्रगतींत मौल्यवान भर घातली आहे.  पूर्वकाळ हिंदू लोकांना शास्त्रीय लष्करी ज्ञान अवगत होते, अशा बद्दल महा भारतात अनेक उल्लेख आहेत; हिंदू लोकांचे, शौर्य व धैर्य, याबद्दल इतिहासांत अनेक उदाहरण आहेत; हिंदू लोकांची दिव्य राजनिष्टा, आणि इमानी वागणूक, याबद्दल इतिहास अनेक दाखले दाखवीत असून त्यांत पन्ना दाई सारखी स्त्री रत्नें ही असल्याचा निर्देश आहे; हिंदू स्त्रियांचे कडकडीत पातिवृत्त्य, आणि अब्रूच्या संरक्षणार्थ त्यांनी केलेले अनेक आत्मयज्ञ, या सर्व गोष्टी हिंदुस्थानच्या इतिहासांत इतक्या पुष्कळ: आहेत की, त्यासंबंधी उदाहरण परंपरा दाखवीत बसणें ही अतीशय पाल्हाळीक व कंटाळवाणे आहे; आणि हिंदू लोकांच्या खड्गयुद्ध निपुणतेबद्दल तर त्यांची इतकी ख्याती आहे कीं, त्यावरूनच पर्शियन भाषेत " त्याला हिंदुस्थानच्या ‘भाषेत उत्तर द्या' म्हणजे त्याच्याशी खड़ग युद्ध करा-अशी म्हण पडली आहे; त्याप्रमाणेच अरबी भाषेतील अतीशय प्रसिद्ध म्हणून नावाजलेल्या " सबू-मो- भलक् " या काव्यांतही, या संबंध "हिंदू खड्गयुद्ध निपुण मनुष्याच्या तरवारीच्या घावा पेक्षांही आपल्या नजीकच्या नावलगाकडून होणारा जुलूम अधिक मारक असतो," असा उल्लेख केलेला आहे. त्याप्रमाणेच हिंदुस्थानांतील तरवारीही सर्व देशांतील तरवारी पेक्षा अधीक पाणीदार व उत्तम होत्या, असाही उल्लेख आढळून येत आहे.

 गायन कलेतील प्राविण्याबद्दल ही पूर्वीच्या हिंदू लोकांचा असाच लौकीक आहे; आणि हिंदूच्या वेदांतील सामवेद हाच मुळी गाण्याच्या सुरांत बसविलेला असून तेथूनच हिंदूच्या गायन कलेस सुरवात झालेली आहे. याशिवाय गायन- कलेतील गंधर्व वेद या नांवाचाही एक वेद आर्यानीं त्याकाळीं शोधून काढिला होता; परंतु तो आतां नष्ट झालेला आहे. हिंदूच्या या गायन शास्त्रांत सहा पुरूष राग--१ हिंदाल, २ श्रीराग, ३ माघ मल्हार, ४, दीपक, ५ भैरव ६ व मालकंस असून छत्तीस स्त्री राग उर्फ रागिणी आहेत; व या प्रत्येक रागिणीं-- तून तीन याप्रमाणे एकशें आठ रागिण्या उत्पन झाल्या आहेत; गया कलेत अनेक निष्णात मंडळी पूर्वकाळी निर्माण होऊन गेलेली आहेत. या गायन शास्त्रातील