Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २१३ )


बद्ध प्रार्थनापर सूक्ता वरून झाला असून या सुक्ता मुळेच पुढे छंदस् शास्त्र, 'ज्योतिष् शास्त्र, व रेखा गणित, उर्फ सिद्धांत, निर्माण झाले आहेत, व त्यांतीलच वर वर्णन केलेला प्रसिद्ध, महत्वाचा, व पूर्व काळांतील, सूर्य सिद्धांत हा युरोपि यन लोकांच्याही माहितींतील ग्रंथ आहे. या बाबतींत प्रोफेसर विल्यम यानें " असे उद्गार काढिले आहेत की, बिजगणीत व भूमिती हीं शोधून काढण्याचें, व ज्योतिष शास्त्रांत त्यांचा उपयोग करण्याचें, श्रेय हिंदू लोकांनाच आहे; ( Indian Wisdom; Page 185 पहा . ) शिवाय या संबंधीचा भास्कराचार्याचा " सिद्धांत शिरोमणी " हा ग्रंथही विशेष महत्वाचा असल्याचे अनेक लेखकांनी मान्य केले आहे; वरील शास्त्रां प्रमाणेच ज्योतिर् शास्त्रांत ही हिंदूचे अनेक ग्रंथ असून त्यांतील नऊ सिद्धांत म्हणजे १ सूर्य सिद्धांत, २ ब्रह्म सिद्धांत, ३ सोम सिद्धांत, ४ ब्रहस्पत्ती सिद्धांत, २ गार्ग्य सिद्धांत, ६ नारद सिद्धांत ७ पाराशर सिद्धांत, ८ पुलस्ती सिद्धांत, आणि ९ वशिष्ट सिद्धांत, हे नऊ सिद्धांत - विशेष प्रसिद्ध आहेत; या सर्वांत, सूर्य सिद्धांत हा जुना व युरोपियन लोकांच्या विशेष माहितींतील आहे. आठव्या शतकांत अरब लोक हे हिंदू लोकांचे निरनिराळ्या शास्त्रांतील विद्या अवगत करण्या करितां शिष्य बनले; त्यामुळे त्यांनी या सर्व सिद्धांतांचे अरबी भाषेत भाषांतर केले; बगदादचा प्रसिद्ध खलीफा हरून् अल्- रशीद आणि अलममन् यांनी हिंदू ज्योतिष शास्त्रवेत्त्यांना उत्तेजन दिलें; त्यांना बगदाद येथे नेलें; आणि त्यांच्या ग्रंथांची अरबी भाषेंत भाषांतरें करविलीं; पाराशर मुनी हा निष्णात, व प्रसिद्ध ज्योतिषी असून त्या शास्त्राची त्यानें मह- त्वाची प्रगती घडवून आणिली; पाराशरा नंतर आर्य भट्ट या नांवाचा एक तसाच माननीय ज्योतिषी निर्माण झाला; व त्यानें आर्य भट्टिका, दासगीतिका वगैरे, ज्योतिष शास्त्रा वरील महत्वाचे ग्रंथ निर्माण केले; त्या नंतर वराह मिहीर, या नांवाचा एक निष्णात ज्योतिषी निर्माण झाला, व त्यानें ब्रहत् संहिता, ब्रज जातक, पंच सिद्धांत, वगैरे ज्योतिष शास्त्रावरील महत्वाचे ग्रंथ निर्माण केले; व त्या नंतर भास्कराचार्य पंडित निर्माण होऊन त्यानें तर हे शास्त्र विशेषच प्रसिद्धीस व पूर्णत्वास नेऊन पोहोचविलं; शिवाय फल ज्योतिषा संबंधी मुहूर्त • मार्तड, रत्नकोश, मुहूर्त चिंतामणी, मुहूर्त सिंधू, ज्योतिर्विदा भरण, सारा बली, बगैरे व संवत्सर, फल पद्धति, संबंधानें कल्पकता, राजावली, जगन्मोहन, नरेंद्र • बल्ली, समय सिद्धांजन, वगैरे ग्रंथ, आर्यानीं निर्माण केले असून स्वरोदय व सारो-