Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २१२ )


सलोतर या नांवाच्या एका मनुष्याने या बाबतींत एक महत्वाचा ग्रंथ लिहिला आहे, व या ग्रंथाचें “करत - अल्-मुल्क" या नावाचे पर्शियन भाषेत पुष्कळच पूर्वकाळी भाषांतर झालेले आहे. सलोतर हा सुश्रुताचा गुरू असून त्याच्या नांवावरूनच त्या ग्रंथास “ सलोतर" हे नाव पडले, असे म्हणतात. या ग्रंथांचे ११ भाग असून तीस प्रकरणे आहेत, व घोड्यांच्या निरनिराळ्या जाती, त्यांचे निरनिराळे आजार व त्याबद्दल उपचार, या बद्दलही त्यांत माहिती दिलेली आहे. शिवाय बगदादच्या खलीपांच्या आज्ञेनें हिंदू वैद्यकीच्या अनेक पुस्तकांची अरबी भाषेत इ० सन ७०० च्या सुमारास भाषांतरें करण्य आलीं होतीं; आणि हिंदूलोकांचें हें वैद्यशास्त्र पहिल्यानें हिंदुस्थानांतून अरेबियांत जाऊन नंतर त्याचा युरोपखंडात प्रसार झाला, असा उल्लेख आढळतो.
 हिंदुस्थानांतील प्राचीन आर्य लोकांत फार प्राचीन काळापासूनच गणीत- शास्त्र भवगत होतें, ही गोष्ट व्यासाच्या भाग्यसूत्रावरूनही सिद्ध होण्यासारखी आहे, असे म्हणता येईल; प्रसिद्ध पंडित भास्कराचार्य याची वैधव्यस्थितीत आलेली नवचाला कन्या लीलावती हिला शिक्षण देण्याकरितां, व या अनाथ व दुर्देवी कन्येच्या प्रेमाविशयाने तिचे स्मारक ठेवण्याकरितां " लीलावती ' हे नांव देऊन त्यानें एक ग्रंथ निर्माण केला; हिंदूचा हा जुना ग्रंथ - लीलावती हा अतीशय उपयुक्त व महत्वाचा म्हणून गणला गेला असून, हिंदुस्थानांतील गणोतशाही पहिल्याने अश्वांनीच या देशांतून अस्वस्थानांत नेलेले आहे; व त्यानंतर या शास्त्राची निरनिराळ्या भाषेत भाषांतरे झालीं आहेत; त्याप्रमाणेच भूमिती शास्त्रासंधाने पाहता त्यांचा पूर्वकाळचा सूर्यसिद्धांत हा ग्रंथ अत्यंत महत्व.चा म्हणून मानिला गेला असून तो इ० सना पूर्वी दोन हजार वर्षा पूर्वी लिहिला गेला असावा, असा अजमास आहे. वेद कालांतपृथ्वी, जल, तेज, वायू, वगैरे देवतांची स्तुती करून त्यांनां संतुष्ट राखण्याबद्दल सुमुहूर्तावर यज्ञ करावे लागत: त्यामुळे आर्यानां आकाशांतील नक्षत्र, वरुप चंद्रांची गती, यांचे बारीक रीतीन अव... लोकन करून यज़ाला योग्य असा काल ठरवावा लागत असे, यामुळे ज्योतिष शास्त्राची उत्पत्ति झाली; त्या प्रमाणेच यज्ञ यागादि कृत्यांसाठी वेदी तयार करण्या संबंधानें वेदांत जे विवेचन केलेले आहे, त्यावरून रेखागणित उर्फ सिद्धांत निर्माण झाले; थोडयांत म्हणजे छंदः शास्त्राचा उगम वेदांतील छंदो-