Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२११ )
 


निराळीं स्वरूपे आहेत, असे प्रतिपादन केलेले आहे; त्यामुळे तिला " अद्वैत- पद्धति " असेही नाभाभिधान प्राप्त झालेले आहे.

हिंदू लोकांच्या वरील प्रकारच्या एकंदर बहुविध तत्वज्ञान शास्त्राची प्रोफेसर मॅक्स मुल्लर यानें अतीशय प्रशंसा केलेली असून "हिंदू लोक हे तत्व- यांचे राष्ट्र होतं, " असे उद्वार काढिले आहेत; त्या प्रमाणेंच प्रसिद्ध ग्रीक तत्ववेत्ता पिथेगोरास हा सहाव्या शतकाच्या सुमारास हिंदुस्थानात तत्वज्ञानाचा अभ्यास करण्याकरितां आला होता; त्यानें इकडे असल्यावेळी हिंदू लोकांच्या तत्वज्ञानाचे मोठ्या बारीक रीतीनें निरिक्षण केलें; आर्यांचे काहीं सिद्धांत ग्राह्य आहेत ही गोष्ट त्यानें मान्य केली, व तसे त्याने आपल्या ग्रंथांतही दिग्दर्शन केले; इकडे असल्या वेळी त्याने पुनर्जन्म, ब्रह्म, अहिंसा, वगैरे विषयांचे व सूत्र ग्रंथाधारानें सिद्धांत शास्त्राचे उत्तम ज्ञान मिळविले; त्या प्रमाणेच सातव्या शतकांतील ग्रोक इतिहासकार हेरोडोटस यानेही आपल्या ग्रंथांत, हिंदू लोक, व वाग्मय वगैरे संबंधी बरीच उपयुक्त माहिती ग्रंथित केलेली आहे. या शिवाय हिंदू लोकांच्या या उच्च प्रकारच्या तत्वज्ञानाबद्दल इतरही अनेक विद्वान लोकांनी अतिशय अभिनंदनपर उद्गार काढिले आहेत.
हिंदू लोकांच्या प्राचीन वैद्य शास्त्रा संबंधानें पाहतां मनूनें हिंदूधर्म शास्त्रांत आरोग्याचे महत्वाचे नियम ग्रंथित केलेले असून, सुश्रुत, चरक, नागार्जुन, व इतर अनेक विद्वान मंडळी, यांचे वैद्यकावरील ग्रंथ आजही लोकमान्य आहेत. हिंदुस्थानात वैद्यकी प्रमाणेच शस्त्रक्रिया शास्त्रही पूर्णपणे अवगत होते व त्यांत पूर्वकालीन हिंदू वैद्य मोठे धीट व निष्णात होते; ही शस्त्रक्रिया ते शरीरातील रक्त प्रवाह दाबून बंद पाडून करीत असत; या शस्त्रक्रियेतही एक निराळी महत्वाची शाखा असून त्यांत कांहीं वैद्य अतीशय निष्णात होते; ते विद्रूप झालेल्या अथवा व्यंगत्व आलेल्या कान व नाक या अवयवांवर शस्त्र- क्रिया करीत असत, आणि त्यांतील व्यंग अथवा विद्रुपता काढून टाकून ते अगदर्दी पहिल्याप्रमाणे करीत असत; ही अत्यंत महत्वाची कला (Rhinoplasty) गेल्या शतकांत इंग्रज लोकांनों हिंदुस्थानांत अवगत करून घेतली व नंतर तिचा युरोपभर प्रसार झाला. ( History of Sanskrit Literature; Page 247 पहा ) मनुत्याप्रमाणेच जनावरांसंबंधही वैद्यशास्त्रात त्याकाळी हिंदू लोक निष्णात असून

चुका उधृत करा: <ref> ला बंद करणारी </ref> ही खूणपताका गायब आहे.</ref>