Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २१० )


असलेला संबंध नष्ट होईल, व तो सदोदित आत्म स्वरूपांत वास्तव्य करीत राहील, असे या तर्कशास्त्र पद्धतींचे मत होतें.
 त्यानंतर चवथी म्हणजे “वैशेषिक पद्धति;" ही कणाद यानें निर्माण केली; त्याचें मत कपिल मुनी प्रमाणेच म्हणजे एकदां आत्मा पूर्ण ज्ञानी झाला, म्हणजे • तो पुन्हां कोणत्याही शरिरांत प्रवेश न करितां आत्मरूपाने स्वतंत्र असाच राहतो हैं- आत्म्या विषय असून जग हें अनेक परिमाणू अथवा सूक्ष्म भाग यांच्या पासून उत्पन्न झालेले आहे, आणि तें अनादि व विकाररहित असून श्रृष्टीत मात्र नेहमी बदल होत असतो, असे या वैशेषिक पद्धतीचे मत होतें.

 त्यानंतरच्या बाकीच्या दोन पद्धति, म्हणजे पूर्व मिमांसा व उत्तर मिमांसा या होत; या दोन्ही ही पद्धति वेदांत सांगितलेल्या गोष्टीस अनुसरून असल्यामुळे त्यांना “वेदांत पद्धति” असे ही सर्व साधारण नांव मिळालेले आहे; या पैक पूर्व मिमांसा - अथवा पांचवी पद्धति ही जैमिनोन निर्माण केली; या पद्धतींत परमे- श्वरा विषयों कांहींच उल्लेख केलेला नाहीं; तर वेदातील आज्ञा प्रमाण मानून त्याप्रमाणे आचरण करणे, पूर्वीप्रमाणे प्रार्थना करण, व स्तोत्रे म्हणणे, व त्यात अनुवादिलेत्या आज्ञा प्रमाण मानून त्याप्रमाणे यथाविधी यज्ञयागादि कमैं आर रणे, हे या पद्धतिचं मत आहे; या पैकीं दुसरी- आणि सहावी व शेवटची पद्धति म्हटली म्हणजे उत्तर मिमांसा" ही असून ती बादरायण व्य साने निर्माण केली आहे त्यात उपनिषधांतील तत्वें ग्रंथित केलेली आहेत; आणि सर्व पदार्थ मग ते सचेतन असोत किंवा अचेतन असोत- परमेश्वरा पासूनच उत्पन्न झालेले असून असते परमात्मा स्वरूपांच एकजीव होणार आहेत, आणि तलें झाल्यावर सर्वच ब्रह्ममय म्हणजे ईश्वर स्वरूप होणार आहे; म्हणून मनुष्यमानें त्या परमे श्वराचेच अन्यन्य भावाने चिंतन, पूजन, व अर्चन, करीत राहिले पाहिजे; . शिवाय, ज्या प्रमाणे विस्तवाची ठिणगी हा मूळ वस्तुत: अभी अथवा अग्नी- चाच अंश आहे, त्या प्रमाणेच मनुष्याचा आत्मा हाही परमेश्वराचाच अंश अनून तो एका जीवांतून दुसऱ्यांत संक्रमण करीत असतो, व आत्म्यांत सर्व गुणांचा उद्भव होऊन तो पूर्ण ज्ञानी झाला, म्हणजे परमेश्वर स्वरूपों तदाकार होतो: असे या पद्धतीचे मत आहे. या पद्धतीत आत्मा व द्रव्य-हीं भिन्न भिन्न सानिलेली नसून वास्तविकरित्या एकाच परमवस्तूची म्हणजे ईश्वराची निर