Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३ )

बलाढ्य, विस्तृत व सुधारणेच्या शिखरास पोहोचलेले असल्याचे दिसते; परंतु ट्यूटन लोकांनी ख्रिस्ती दशकापूर्वी ११३ वे वर्षांपासून त्या साम्राज्यावर सारखे हल्ले करून शेवटीं इ० सन ४७६ मध्ये त्याचा बहुतेक नाश केला. त्यानंतर पांचव्या शतकापासून त्या लोकांवर x हूण लोकांच्या पूर्वेकडून स्वान्या होऊं लागल्या; त्यामुळे त्यांच्या मुख्य चार जमावांपैकीं व्हँडाल लोक स्पेन व पोर्तुगाल देशांत गॉथ लोक आस्ट्रिया पोलंड, व स्वीडन या देशांत आणि अँगल्स व साक्सन लोक इंग्लंडांत जाऊन राहिले; तथापि काँक व अलमनी हे लोक मात्र आपल्या पूर्वस्थानांतच राहून तेथे त्यांनी आपली राज्य स्थापन केलीं. रोमन साम्राज्य नष्ट झाल्यापासून तो शार्लमेन बादशहाच्या कारकीर्दीपर्यंतच्या


 x हूण लोकः -- या लोकांसंबंधीं डाक्टर जीवनजी मोदी यांच्या लेखा- वरून खालील माहिती उपलब्ध होते ती :-
 हूण लोक हे प्रथमतः चीन देशाच्या उत्तरेस अमूर व इरलिया नद्यांच्या दरम्यानच्या प्रदेशांत रहात होते. पुढे त्यांनी तार्तरी प्रांत जिंकिला; तेथें ख्रिस्ती शकापूर्वी २०० वर्षे त्यांनीं राज्य केले. ख्रिस्ती शकाचे कांहीं पूर्वी व नंतर त्यांचा जगांतील सर्व मोठमोठ्या साम्राज्यांशी संबंध आला. रोमचे राज्य त्यांनीं नाहींसें केलें. चिनी लोकांनी त्यांना प्रतिबंध करण्याकरितां प्रसिद्ध चिनी भिंत बांधिली. तेव्हां ते पश्चिमेकडे वळले. त्यांच्याच चेपीमुळे स्याक्सन लोक इंग्लंद देशांत गेले. त्यांचा इतिहास दोन हजार वर्षांचा आहे. तेवढ्या काळांत त्यांनी इराणांत स्वाऱ्या केल्या, व हिंदुस्तानांतील गुप्त साम्राज्य नष्ट केलें; त्यांचा शेवटचा राजा मिहिरल या नांवाचा होता.
 आपले मृत राजे पुरण्याची त्यांची विलक्षण रीत होती; ते कोठें पुरले आहेत हैं लोकांस करूं नये हाणून कधीं कधीं ते मोठमोठ्या नद्यांचे प्रवाह फिरवीत, व त्या ठिकाणीं त्यांना पुरुन पुन्हां त्यांवर नद्या सोडीत; आणि ज्या लोकांकडून है काम ते करवून घेत, त्यांना ते ठार मारीत.
 फ्रान्स, इताली, जर्मनी व युरोपांतील इतर उत्तरेकडील देश, त्यांनी ओसाड केले, व खलिफाचे राज्य घेऊन सिस्तांची पवित्र भूमि, पालिस्टाईन हीही त्यांनीं आपल्या ताब्यांत घेतली. याच लोकांना पुढे तुर्क हें नांव प्राप्त झालें.