Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२०९)


त्या प्रमाणंच यज्ञातील स्थंडिले, ब वैदिका यावरून कल्पना बसवून त्यांनी भूमिति शास्त्र निर्माण केलें; वरील शास्त्रां प्रमाणेच प्राचीन हिंदूंन तत्वज्ञान ही निर्माण करून, त्याची निरनिराळी सहा अंगे सहा ऋषींनीं ग्रंथित केलीं.

 या सहा पद्धति पैकी पहिली म्हणजे "सांख्य पद्धति" ही असून ती कपिल मुनीनें निर्माण केली; या पद्धतींत, स्वत:स जे प्रत्यक्ष दिसेल, अथवा मानवी दृष्टी, मन, अथवा बुद्धी, यांनां जें दृग्गोचर होईल, तेवढेंच मात्र विश्वास ठेवण्यास योग्य आहे, असे त्याने प्रतिपादन केलें; म्हणजे वेदांत सांगितलेल्या गोष्टी, व ईश्वराचे आस्तित्व है या सांख्य पद्धतीस मान्य नव्हते; तर सर्व काळी असणाऱ्या, म्हणजे चिरकाल अथवा नित्य, अशा द्रव्या पासून हे दृश जग आपोआप उत्पन्न- झाले असून श्रृष्टी व आत्मा या दोन गोष्टीसच खरें अस्तित्व आहे, व याच दोन : गोष्टी आतापर्यंत सदोदित अस्तित्वांत असून पुढेही अस्तित्वांत रहातील, मनु- प्याचा आत्मा हा काही काळ शरिरात असतो, व नंतर त्याच्या पाप पुण्य वगैरे कर्मानुसार तो उच्च नीच प्राण्याच्या अथवा वनस्पतीच्याही शरिरात प्रवेश करितो; आणि जर हाच आत्मा पूर्ण ज्ञानी झालेला असला तर तो पुन्हां कोण- यही शरिरांत प्रवेश न करितां आत्मरूपानें स्वतंत्र असाच राहतो, असे या सांख्य पद्धतीचे मत होतें.
 त्यानंतर दुसरी म्हणजे " यांग पद्धति " ही असून ती इ. सनापूर्वी २०० च्या सुमारास पातंजली याने निर्माण केली. महा आदिकरण, अथवा परमात्मा हा एकच असून त्याच्यापासूनच जगांतील सर्व वस्तूंची उत्पत्ति झाली आहे; त्यामुळे इतर कोणत्याही गोष्टीचा विचार करण्याचे सोडून देऊन फक्त परमेश्वरा विषयच विचार करीत राहिल्यास मानवी आत्मा जड शरिराच्या ससर्गापासून मुक्त होऊन ईश्वराशीं दत्तात्म होतो, असं या योगपद्धतीचे मत होते.

 त्यानंतर तिसरी म्हणजे "तर्कशास्त्र - " अथवा "न्यायशास्त्र - उद्धति; " दी गौतमानें निर्माण केली. कोणत्याही वस्तू संबंध तर्क कसा करावा, आणि असा तर्क करून वस्तूंचे ज्ञान कसे करून घ्यावें, या विषयीं या पद्धतींत विचार केलेला आहे; शिवाय सर्व पदार्थांची उत्पत्ति परमेश्वर पासून झालेला आहे, परंतु आत्मा हा अनादि असून जेव्हां तो पूर्ण ज्ञानी होईल, तेव्हाच त्याचा शरिराशीं

 १४