Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२०८)


वादन करणारे लोक त्या शहरात वास्तव्य करीत होते. ( Historical Reserch- es Vol. II पान २२० पहा.)
 हिंदुस्थानातील पूर्व कालीन नमुनेदार राज्य व्यवस्थेचा-ज्या राज्यव्यव स्थेचा वर थोड्याशा खुलाशानें उल्लेख केला आहे त्या राज्यव्यस्थेचा बाह्य प्रदेशीही विशेष लौकिक पसरलेला होता; आणि इराणचा प्रसिद्ध व न्यायो बादशाहा नौशरवन याचा नामांकित प्रधान बशरचामेहर हा हिंदुस्थानांत राजकीय ज्ञान व शिक्षण मिळविण्या करितां येऊन, व येथेच त्या विषयांत प्रविण्य संपादन करून, पुढें इराणात तो प्रसिद्ध मुत्सद्दि म्हणून नांवाजला गेला होता, असा उल्लेख आढळतो; त्या प्रमाणेच या देशांतील पूर्व कालीन वांग्मय, अनेक निरनिराळ्या विषयांचे मोल्यवान व मननीय ग्रंथ, व त्यांत हिंदू लोकांन मिळविलेलॅ प्रविण्य,या विषयीं मार्गे वेळों वेळों थोडक्यांत उल्लेख आलेला आहेच तथापि त्या बाबतींत ही या ठिकाणीं अणखीं थोडेसे अधिक विवेचन करणे आवश्यक आहे; या ठिकाणी पहिल्याने ही गोष्ट दिग्दर्शित केली पाहिजे कीं, प्रसिद्ध चिनी प्रवासी ह्यू - एन-त्संग हा हिंदुस्थानांत आल्यावर पांच वर्षे नालंद येथे राहून त्यानें, योगशास्त्र, न्यायानुसार शास्त्र, अभिधर्मशास्त्र, हेतुविद्याशास्त्र, व शब्दविद्याशास्त्र, वगैरे शास्त्रांचा आपण अभ्यास केल्याचे नमूद केले आहे; म्हणजे वांग्मयाच्या अनेक विषयांपैकीं वरील विषयांच्या नैपुण्यांत हिंदुस्थान अग्रगण्य म्हणून गणला गेला होता, है उचड आहे; वरील शास्त्रांशिवाय इतरा- संबंधीं पाहतां अर्से निदर्शनास येतें कीं, प्राचीन हिंदू लोकांनीं गणितशास्त्र, - ज्योतिषशास्त्र व भूमितिशास्त्र, ह्या कलाही पूर्णतेस नेल्या होत्या; त्यांनीं आकाशाचे अवलोकन करून, व चंद्राची गती निरिक्षण करून त्याच्या मार्गा- वरील अठ्ठावीस तारका पुंजास निरनिराळी नांवें दिलों, व अशा रीतीने ज्योतिष शास्त्र निर्माण केले. यांस त्यांनी “चंद्रांची गृहें" अशी संज्ञा दिली. व पौर्णिमेच्या दिवशीं ज्या तारका पुंजांत चंद्र असे, त्याच्या नांवा वरून त्यांनीं वर्षांतील बारा महिन्यांनां द्वारा नांवें दिली; आणि आकाशांतील ग्रहांचे व नक्षत्राचे वेध घेण्या करितां त्यानंतर जयपूर, मथुरा, काशी, उज्जयनी, तक्षशीला वगैरे ठिकाण वेधशाळा स्थापन केल्या. त्या प्रमाणेच त्यांनी अंकाचा म्हणजे गणित शास्त्राचा अभ्यासः करून “ दशक पद्धती ” शोधून काढिली, व ही पुढे पाश्चिमात्य राष्ट्रात पसरली.