Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२०७ )


nistration in Ancient India. By P. Bannerjee है पुस्तक पहा.) असाही उल्लेख आढळतो कीं, अल्पजन सत्तेचे अत्यत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे लिच्छवीस यांचे असून त्यांतील सर्व पुढान्यांस "राजा" की संज्ञा असे; त्या प्रमाणेच आर्यामध्ये त्यांच्या युरोपियन बांधवाप्रमाणेच स्वतंत्र राजकीय संस्थाबद्दल उपजतच आवड होती; आणि प्रजातंत्री राज्यांच्या अस्तित्वाबद्दल बौद्ध धर्मीय पालो ग्रंथांतूनही बरेच उल्लेख आलेले आहेत.
 हिंदुस्थानातील पूर्वकालीन समुद्रगुताच्या साम्राज्याचा विस्तार केवढा मोठा होता, याबद्दल व्हिन्सेंटरमथ यानें असे लिहिले आहे कीं, "चवथ्या शतका मध्यें उत्तर हिंदुस्थानांतील सर्व सुपीक व लोकवस्तीने गजबजलेला प्रदेश • समुद्रगुप्ताच्या तात्र्यांत होता, त्याच्या साम्राज्याचा विस्तार, पूर्वेस हुगळी नदी- पासून पश्चिमेस चंचळा नदीपर्यंत, आणि उत्तरेस हिमालय पर्वताच्या पायथ्यापासून तो दक्षिणेस नर्मदा नदीपर्यंत झालेला होता; व सहाव्या शतकापूर्वी अशोकाच्या अमलाखाली जेवढे साम्राज्य होते, त्याहून पुष्कळच पटीनें मोठें, असें त्याचं साम्राज्य होते; म्हणून स्वाभाविकरित्याच त्यास समुद्रगुप्त असें नांव मिळालेले होत. गांधार, आणि काबूलचा राजा कुशान, आक्सचा राजा, आणि सिलान व इतर दूरस्थ द्वीपे यांच्याशी त्या साम्राज्याचे राजकीय दळण वळण होते. अशा व्यापक साम्राज्या प्रमाणेच, हिंदुस्थानांत मोठमोठाली व्यापक, भरभराटीत असलेली, व लोक वस्तीनें गजबजलेली, शहरें ही होतों; पाटलीपुत्र उर्फ पाटगा, अवंती उर्फ उज्जयनी, कनोजनगर, उर्फ कनोज ह्रीं शहरें अतीशय मोठी व लोकवस्तीनं गजबजलेली असून मॅगस्थनी सच्या म्हणज्या प्रमाणे, कनोज शहराची लांबी साडेतीन मैल असून रुंदी पाऊण मैल होती; त्याच्या सभोवती खंदक व चांगले बुरूज होते; तेथील सरोवरांचे व तला- वाचे पाणी स्फटिका प्रमाणे स्वच्छ व तेजस्वी असून त्यांच्यात पडलेल्या लता पुष्पांच्या प्रतिबिंधामुळे तर तें फारच मनोहर दिसत होते. त्या शहरांत निरनिराळ्या अतीशय मौल्यवान पदार्थांची देवघेव चालत असे, त्यामुळे तेथें सर्व ठिका- णचा माल येत असे; तेथील लोक अत्यंत सुखी व संतुष्ट असून त्यांची निवास स्थानें फारच रमणीय असत, व फल पुष्पांची तर तेथे समृद्धीच असे; याच कनोज शहरा बद्दल आणखी असा ही उल्लेख आढळतो कीं, या ठिकाणी नुसती पान सुनारी विकण्याचीच निदान तीस हजार दुकानें होतीं, व साठ हजार गायन