Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २०६ )


निवडला जाई, व तो "राजा" ही पदवी धारण करी. ही पदवी रोमन कौन्सल किंवा ग्रीक अरकान याला समानअर्थी आहे. त्या प्रमाणेच प्राचीन बुद्ध लेखांवरून अर्मे ही सिद्ध झाले आहे कीं, सामर्थ्यवान एकतंत्री राज्यांच्या बरो- बरीचींच कांहीं लोकतंत्री राज्येही त्या काळीं अस्तित्वांत होतीं; व तीं पूर्ण • स्वातंत्र्याचा उपभोग घेत होतीं; या बुद्ध लेखांना त्या नंतरच्या जैन लेखांनी ही पुष्टी दिलेली असल्याने त्यांच्या सत्यासत्यतेबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. (हीस डेव्हीस.) त्या प्रमाणेच पंजाब, पूर्व राजपुताना, व माळव्यां- •तील बहुतेक भाग अशाच प्रकारच्या प्रजासत्ताक राज्यांच्या ताव्यांत होता; शिवाय इ. सन २८९८ मध्ये बंगाल अॅशिऍटिक सोसायटीचे अध्यक्ष डाक्टर होर्नूल यानें जैन धर्मावर जे एक व्याख्यान दिले, त्यांत त्यानें जैन धर्माचा संस्थापक महावीर हा एक अल्पजनसत्ताक राज्यांत जन्मला होता, असे विधान केले आहे. अल्पजन सत्ता, हा, राजसत्ता, व लोकसत्ता, यांच्या मधील दुवा आहे; वैशाली येथे अल्पजन सत्ताक राज्य पद्धति चान्द्र होती; व तिच नियंत्रण क्षत्रीय जातींतील पुढारी मंडळांच्या हाती होतें "कांहीं राज्यावर राजे लोक स्वतःच राज्य करीत असत, व कांहीं टिकार्थी लोक सत्ता राज्य चालवित असे; उदाहरणार्थ, महाभारतांत वृष्णींनी असेच अल्पजन सत्ताक राज्य स्थापन केले होतें, व त्यांचें एक पुढारी मंडळ असून कृष्ण हा ही त्यांतील एक प्रमुख होता; त्याकाली भारत वर्षात कोणत्या ना कोणत्या रूपाने लोक तंत्री संस्था अस्तित्वांत त्या, ही गोष्ट निर्विवाद आहे; त्या प्रमाणेंच कुमार गुप्त व बंधुवर्धन यांच्या मंदोसर येथील शिला लेखा वरून, मालव देशांत लोक सत्ताक राज्यपद्धति चालू होती, असे दिसून येत आहे. शिवाय अवस्ट लोक हे ज्या नगरांतून रहात होते, तेथें ही लोकतंत्री राज्यकारभार चालत असून करटियसनें ही - "सचरकाई" ( Sabarcae ) या नांवाच्या एका शक्तिसंपन्न जातीचा उल्लेख केलेला आहे; त्या ठिकाणीं हीं लोक सत्ताक राज्यपद्धति; रूढ होती, आणि मल्लोईनी जेव्हा शिकंदर बादशहाचे वर्चस्व मान्य केले, त्या वेळी त्यांनीं त्यास असे स्पष्ट बजाविले होते की, स्वराज्य व स्वातंत्र्य यजिवर आमचे अत्यंत प्रेम असून हिंदुस्थानांत डायोनियस आल्यापासून तो शिकंदरच्या स्वारीपर्यंत आम्ही आपल्या स्वातंत्र्याचे संरक्षण केलेले आहे शिवाय ( Pablic Admi