Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २०५)


 साम्राट चंद्रगुप्ता प्रमाणेंच, साम्राट अशोक व समुद्रगुप्त यांच्या ही नमुने- दार राज्य कारभाराबद्दल मागे विवेचन केलेलेच आहे. तथापि त्याही बाबतींत व्हिन्सेंट स्मिथच्या शद्धांतच थोडासा अधिक खुलासा या ठिकाण करणे इष्ट आहे. अशोकाच्या साम्राज्या बद्दल तो म्हणतो:- अशोकाच्या साम्राज्यांत अफ- गाणिस्थान, हिंदूकुश पर्वताच्या दक्षिणे कडील प्रदेश, सिंध, बलुचिस्थान, कश्मीर व नेपाळ, व हिमालय पर्वताच्या उतरणी वरील प्रदेश, यांचा समावेश होत असून अगदर्दी दक्षिण टोका शिवायच्या सर्व प्रदेशाचा त्याच्या साम्राज्यांत समा वंश होत होता;... अशोकाच्या वेळीं वास्तु विद्या उच्चावस्थेस पोहोचली होती; त्याप्रमाणेंच नक्षी वगैरे कला कुसरीचें काम ही पूर्णत्वास गेलेले होतें; मोठमोठ्या इमारतीवर नाना प्रकारच्या वेलपत्या वगैरे असून नक्षी कार्मे कोरून त्या शोभिवंत करीत; आणि मनुष्यांचे व पशुपयांचे पुतळेही फारच सुत्रक तयार करीत असतः साम्राज्याच्या फार दूरच्या प्रदेशांतही जमी- नीला पाण्याचा पुरवठा व्हावा, म्हणून अतीशय परिश्रम घेतले जात; यावरून शेतकीच्या जमीनीला पाण्याचा पुरवठा करणें है आपले एक विशिष्ट कर्तव्य आहे, असे मौर्य साम्राट समजत असत; व ( मॅगॅस्थनीसच्या म्हणण्याप्रमाणे ) इजित देशाप्रमाणेच येथेही सरकारी अधिकारी जमीनीची मोजणी करून प्रत्येकास त्याच्या त्याच्या वाट्याप्रमाणे बरोबर पाणी मिळते की नाहीं हे पहात अस्त, हे उघड आहे;
 महाभारत व रामायणांतील राज्यपद्धति, व राजनीति यांचे वर्णन लक्षांत घेऊन चाणाक्याची राजनीति, अथवा चंद्रगुप्त, अशोक समुद्रगुप्त वगैरे साम्रा- टांची राज्यपद्धति यांचे निरिक्षण करून आणि इतरही ऐतिहासिक उपलब्ध माहिती आधारभूत धरून, असे सिद्ध करून दाखविता येईल की, हिंदुस्थानांत पूर्वकाळी ज्याप्रमाणे निव्वळ राजसत्ताक पद्धति चालू होती. त्याप्रमाञ्च अल्पजन सत्ताक राज्यपद्धति ही रूढ होती; व हीच गोष्ट मि. न्हीस डेव्हिस, व्हिन्सेंट त्मिथ, डाक्टर सर भांडारकर, मि. मॅक किंडल, वगैरेंच्या लेखावरून ही स्पष्ट होते; उदाहरणार्थ, कपिल वस्तू येथें शाक्य लोक " संथागार " या नावाच्या एका सार्वजनिक दिवाणखान्यांत आपला कारभार व न्याय करण्याचे काम करीत; त्यावेळी वृद्ध, तरुण वगैरे सर्व लोक तेथें हजर असत; आधिवेशनाच्या प्रसंग, अथवा अधिवेशन नसेल तर राजकाजासाठी एक मुख्य अधिकारी