Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २०३ )

वाढ्याशीं नेहमीं सख्य असणे, किंवा राहणे, अशक्य आहे; म्हणून जो बलवान् असेल त्याने दुसऱ्यास जिंकावें; कारण आत्मबलाशिवाय सुरक्षितपणा मिळणे शक्य नाहीं; व राजकारणात बलाशिवाय दुसरी नीति ही नाहीं; त्या प्रमाणेच युक्ति व भेद या दोन्हीं ही गोष्टी राजकारणांत आवश्यक आहेत, म्हणून राजाने हेर ठेवून त्यांची सर्व राजकाजांत नेहमीं अत्यंत मदत घेत राहिले पाहिजे.
 गुप्तहेर:- या काळांत गुप्त हेरांचं काम करण्याकडे कसबिणीचा धंदा करणाऱ्या स्त्रियांचा उपयोग केला जात असे; यासंबंधानें बरेच नियम केलेले आढळतात; त्या प्रमाणेच गुप्त बातम्या आणणाऱ्यांना विशेष मुभा अथवा सवलती दिल्याचाही उल्लेख आढळतो.
 विक्रीवरील करः - तटबंदीच्या शहरांत मालाच्या विक्री प्रमाणे कर घेतला जात असे; धान्य, गुरें, व आणखी कांहीं जिनसा, याशिवाय करूनच्या बाकी सर्व जिनसा, जकातीच्या नाक्यावर विकाव्या लागत असत; परगांवचे आयात मालावर, शेकडा वीस टक्के, या प्रमाणे कर असे. तथापि पुष्कळ जिनसांवर शेंकडा चार ते सहा टक्के कर असे; व जड जवाहिरांवरील कराचे दर बरेच अधिक प्रमाणांत असत.
 खाने सुमारी खातें: – या खात्यावर नागरक या नांवाचा एक अधिकारी असे; व त्याच्या हद्दीत जीं नवीं माणसे येतील, अथवा गांवांतील व इतर परगांवीं जातील, त्यांची नोंध करण्याचे काम त्याच्याकडे असे; शिवाय प्रत्येक मनुष्याची जात, नांव, अडनांव, धंदा, उत्पन्न, गुरें, खर्च, स्त्री, अथवा पुरुष, वगैरे माहिती गोळा करण्याचें, व ती संग्रहित करून ठेवण्याचे कामही त्याच्याकडेसच सोपविण्यात येत असे.
 खोटी माहिती देणेः-- खोटी माहिती देण्याबद्दल अथवा दिल्याबद्दल, चोरीच्या गुन्हया प्रमाणेच, शरिराचा एखादा अवयव तोडणे, ही शिक्षा देण्यात येत असे.
 मद्य विक्रीः- मद्य विक्री साठीं परवाने घ्यावे लागत असत; आणि परदेश- तून येणाऱ्या मद्यावर विशेष कर टेविलेले असत; दारूच्या दुकानांत गि-हाइ- कास बसण्या करितां पलंग, खुर्चा वगैरे सोई कराव्या लागत, आणि ऋतूमाना प्रमाणे शेगड्या, पंखे, सुवासिक फुलें, अत्तरें, बगैरे जिन्नस सुद्धां दुकानांत ठेवावे लागत असत.