Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २०२ )

लोकांना सरकारांतून आश्रय व नेमणुका मिळत असून त्यांचे सिद्धांत व भाकिर्ते खरी खोटी ठरतील त्याप्रमाणे त्यांनां इनाम अथवा शासन देण्यांत येत असे; त्या प्रमाणेच प्रसिद्ध व निष्णात कारागीर, आणि आरमारी खात्याकरितां उत्तम प्रकारची जहाजे बांधणारी तज्ज्ञ माणसे, यांना सरकारांतून वेतन मिळत असे.. इत्ती, घोडे, वगैरे वापरण्यास परवानगी लागत असे. रस्ता दुरस्तीच्या कामावर अधिकारी नेमलेले असत; व ते दुरस्त ठेवण्याची जबाबदारी त्या अधि काऱ्यांवर असे; या रस्त्यावर दर अर्ध कोसावर खांब असून पाटलीपुत्र या राजधानीच्या शहरा पासून थेट वायव्य सरहद्दी पावेतों एक मोठा रहदारीचा रस्ता बांधिलेला होता; व तो मुस्थितीत ठेविलेला असून त्यावर ही योग्य अधिकान्यांची पूर्ण देखरेख होती.
 चंद्रगुप्ताचा ब्राह्मण प्रधान चाणाक्य यानें “राजनीति " या ग्रंथास, चाणाक्य राजनीति, आर्य राजनीति, आर्य चाणाक्यानोति अथवा अर्थ शास्त्र अशीं ही निरनिराळीं नांवे आहेत या नांवाच एक राजनीतिपर ग्रंथ प्राचीन ग्रंथांचे आधार घेऊन लिहिलेला असून इ. सन १९५० मध्यें अबू शहाबाद या नांवाच्या एका मनुष्यानें त्यांचे पार्शियन भाषेत भाषांतर केलेले आहे; व त्या नंतर त्याचें इतर निरनिराळ्या युरोपियन भाषांत व इंग्रजींतही रूपांतर झालेले आहे; ( प्रोफेसर आर. रामशास्त्री बी. ए. बंगलोर कालेज कृत चाणाक्याच्या अर्थ शास्त्रांचें इंग्रजी भाषांतर पहा; ) त्यांत ग्रंथित केलेल्या-राज नीतीच्या अनेक तत्वांपैकी काहीं उदाहरणा दाखल पुढे दिली आहेत; तो म्हणतो:- राजास सल्ला मसलत देण्या करितां वारा अथवा सोळा प्रवानांचे एक मंडळ असे; परंतु ब्राह्मणाच्या अभिप्रायास राजा विशेष मान देत असे; राजद्रो- हाच्या गुन्ह्याशिवाय ब्राह्मणांना देहांत शिक्षा देण्यांत येत नसे; व इतर भारी स्वरूपाच्या गुन्ह्याबद्दल त्यांच्या तोंडावर डाग देऊन त्यांना हद्दपारीची अथवा जन्मभर खाणीवर काम करीत राहण्याची शिक्षा देण्यांत येत असे; - मनूच्या धर्मशास्त्रांतही अशाच आशयाचा नियम आहे; व तो नियम- म्हणजे ब्राह्मणानें कितीही मोठा गुन्हा केला असला तरी मुद्धां त्यास देहांत शिक्षा न देण्याच्या बाचती पुरता नियम - ब्रिटिश सरकारानें इ० सन १८१७ मध्ये रद्द केला आहे. चाणाक्य म्हणतो: आसपासच्या राजे रज-