Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २०१ )

गुन्ह्यांबद्दल देहांत शिक्षा देण्यांत येत असे; त्या प्रमाणेच साम्राज्यांतील राज्य- व्यवस्थे संबंधानें पाहतां साम्राज्याचे प्रांतवार अनेक सुभे केलेले असून प्रत्येक प्रांतावर एकएक स्वतंत्र सुभेदाराची नेमणूक केलेली असे; आणि त्यांच्या बरील तपासणी करितां दुसरे हो स्वतंत्र अधिकारी नेमिलेले असत; जमीनीवरील करासबंधी म्हणावयाचे म्हणजे, उतन्ना पैकीं चवथा हिस्सा “राजभाग" म्हणून राजास द्यावा लागत असे; बुद्ध विषयक कार्य क्षमतेसंबंधीं पाहतां युद्धाची कामगिरी क्षत्रीय वर्गाकडेसच स्वतंत्ररित्या सोपविलेली असे. त्यामुळे शेतकरी वर्ग व कृषिकर्म करणारा इतर जन समाज, यांना युद्धावर जावें लागत नसे; इतकेंच नव्हे तर आसपास एखादें मोठें घनघोर युद्ध चालू असतांनाही कृषिकर्म करणारा वर्ग आपापल्या शेतीच्या उद्योगांत गर्क झालेला असे; हे पाहून मॅगस्थनीसला अतीशय आश्चर्य वाटले; आपल्या राज्यांतील या शेतकीच्या धंद्यांस उत्तेजन देण्याकरितां व रयतेच्या सुखसगवडी करितां चंद्रगुप्तानें पाट बांधायचे एक स्वतंत्र खातें निर्माण केले होते; या खात्याकडून लोकांच्या जमीनीची मोजणी होत असे, आणि पाटपाण्याचा सर्वांना सारखा फायदा मिळावा म्हणून वेळच्यावेळी पाणी सोडण्याच्या व बंद करण्याच्या काम ते 'खातें अतीशय सावधगिरी बाळगीत असे. याच साम्राटानें काठेवाडांतील गिरनार पर्वताच्या शेजारी सुदर्शन या नांवाचा एक तलाव बांधिला; त्याप्रमाणेच चंद्रगुप्ताचा मेहुणा, साम्राज्यांतील पश्चिम प्रांताचा प्रतिनिधी असतां, त्यानेंही गिरनार पहाडाच्या पूर्व बाजूम असलेल्या एका ओढ्याचें पाणी अडवून एक बंधारा बांधिला; चंद्रगुतानंतर पुढील काळांत अशोकाच्या कारकीर्दीत तुशास्फ या नांवाच्या त्याच्या प्रतिनिधीनें या बंधान्यांत मुबलक पाणी आणून • सोडण्या करितां पाट बांधिले; पुढे चारशे वर्षांनी, इ० सन १५० या वर्षी एक मोठा जलप्रलय होऊन तो मोडून गेला; त्या नंतर चवथा क्षेत्रप अथवा महाक्षत्रप रुद्रदामा यानें त्याची दुरस्ती केली; परंतु तो ही पुढे पडून गेला असून या संबंधी गिरनारच्या पहाडावर लेख उपलब्ध आहे; या वरून, शेतीच्या अभिवृद्धि विपर्थी ज्या अर्थी हे राज्यकर्ते इतकी काळजी घेत असत त्या अर्थी शेतकीस अत्यावश्यक असणारे बैल, व त्यांची मुबलक पैदास करणाऱ्या गाई, यांच्या संबंधीही ते तशीच काळजी घेत असले पाहिजेत हे उघड आहे. चंद्रगुप्ताच्या वेळी तत्ववेत्ते, याज्ञिक, ज्योतिपी वगैरे