Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २०० )

विशेष हैं आहे की, ब्रिटिश हिंदुस्थानांत सुद्धा या बाबतीकडे राज्यकर्त्यांचे लक्ष- लागल्यास फार दिवस झाले नाहींत, व देशी संस्थाना पैकी काहींचे तर अद्यापही या गोष्टीकडे फारसे लक्ष पोहोंचलें नाहीं; ही गोष्ट ध्यानात घेतली असतां इतक्या प्राचीन काळींही चंद्रगुप्तानें हें खातें निर्माण करण्यांत केवढ्या विलक्षण कल्पक- तेची योजना केली, या बद्दल आश्चर्य वाटल्या वांचून रहात नाहीं; चंद्रगुप्ताने निर्माण केलेल चवथें खातें, है व्यापार विषयक खातें असून, व्यापाराकडे लक्ष पुरविणे हे त्या खात्याचे काम असे; त्या प्रमाणेच सरकारी शिक्यांची वजने व मापे तयार करवून त्यांचाच सर्व लोक उपयोग करितात कीं नाहीं, हें पाहणे, आणि व्यापाऱ्यांना परवाने देणे, वगैरे कामे या खात्याकडून होत असत: त्याप्रमाणेच पांचव्या खात्याचे काम कारखान्यांवर देखरेख ठेवणे, हें असून जुन्या नव्या मालाची निवड करणे व त्यावर योग्य कर बसविण, हे काम त्या खात्याकडे सोपविलेले असे; या गोष्टीवरून इतक्या पूर्व कालांत ही हिंदुस्थानांत कारखाने असून, त्यावर देखरेख ठेवण्यासाठी एक स्वतंत्र स्वातं निर्माण करण्या इतका, त्यांचा विस्तार झालेला होता, हे उघड होतें; त्याप्रमा- र्णेच सहाव्या खात्याचे काम सर्व प्रकारच्या मालाच्या विकीनंतर त्याच्या किंमतीचा दहावा हिस्सा कर म्हणून वसूल करावयाचा, हे असे; व बाजार, देवळें, मंदिरें वगैरेवर ही शहर मुधराई खात्याचीच देखरेख असे; वरील एकंदर विवेचनावरून चंद्रगुप्ताच्या राज्यांतील शहर सुधराई खात्याची व्यवस्था कितीं नमुनेदार होती, हें स्पष्टपणे निदर्शनास येतं. पाटलीपुत्र उर्फ पाटणा या नगरा प्रमाणेच, तक्षशीला व उज्जयनी या शहरात ही व्यवस्था असून मॅगस्थनीस हा पुढे लिहितों कों, भी चंद्रगुप्ताच्या छावणीत असताना त्यावेळी तेथे अजमातें चार लक्ष लोक होते; परंतु इतका मोठा जनसमूह एके ठिकाणी रहात असून मुद्धां कोणत्याही वेळीं त्या ठिकाणी ८० रुपयापेक्षा जास्त किंमतीची चोरी झाली नाहीं. गुन्हेगारास फार कडक शिक्षा देण्यात येत असत; आणि खोटी साक्ष देण्याच्या गुन्ह्याबद्दल हातांपायाची बोटे तोडून टाकीत असत; त्या प्रमाणेच पवित्र मानिलेल्या झाडांचा नाश करणे, अथवा त्यांना, तीं नाश होतील अशी इजा करणें, विक्री झालेल्या मालावरील सरकारी दस्तुरी अथवा जकात चुकविणे, व राजाची स्वारी शिकारीस जात असतां त्यास वाटेंत हरकत करणे, वगैरे