Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २ )

वस्थित व सुधारलेली होती का दरिद्री, अव्यवस्थित व रानटी स्थितींतील होतीं, त्यांची राज्यव्यवस्था नमुनेदार व प्रजाहितेच्छु होती, का अनियमबद्ध व प्रजा- पीडक, अशा सुलतानी स्वरूपाची होती, तीं संपत्तिमान् होतीं का निर्धन होतीं, वगैरे बाबतींचें आणि हिंदुस्थानांतील धार्मिक वातावरण व त्याचा राजकीय घडामोडीवर निरनिराळ्या काळी अवश्यमेव घडून येत गेलेला परिणाम या गोष्टीचें-योग्यठिकाणी दिग्दर्शन केलेले आहे. त्या प्रमाणेच एकामागून एक अथवा एकाच वेळी घडलेल्या अनेक गोष्टी यांचेही त्यांत दिग्दर्शन केले आहे; थोडक्यांत म्हणजे कोणत्याही बाजूनें हा ग्रंथ अपूर्ण राहू नये, तो वाचतांना इतर कोणताही ग्रंथ पाहण्याची फारशी आवश्यकता राहूं नये. व याच ग्रंथांत आवश्यक व आनुषंगिक ती सर्व माहिती एकत्र वाचण्यास मिळावी, अशा उत्कट इच्छेने तशी विशेष खबरदारी घेऊन, व त्या क्रमाला अनुसरून हा इतिहास लिहिला आहे.
 त्या प्रमाणेच हा इतिहास लिहितांना, कित्येक ठिकाणीं परस्पर विरुद्ध अथवा निरनिराळी माहिती आढळून आली ती, साधक बाधक आधार पाहून, व शक्य तोपर्यंत खऱ्या खोट्याचा व ग्राह्यात्राह्माचा निर्णय करून या ठिकाणी ग्रथित केली आहे, व कित्येक टिकाणी त्याच संबंधीच्या निराळ्या माहितीचाही उल्लेख केलेला आहे. शिवाय हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास फारसा उपलब्ध नसून जो उपलब्ध आहे, त्यांतही परस्पर विरुद्ध अशी निरनिराळी माहिती विशेष असल्याने ती देतांना शक्य तोवर विशेष खबरदारी घेतली आहे. तसेंच आर्य लोकांच्या मूळ वसतिस्थानाबदल मतभेद असून त्याबद्दल, व हूण लोकांबद्दल निरनिराळी माहिती उपलब्ध झाली आहे; त्यामुळे पूर्वीची माहिती, व नवीन माहिती ह्या उभयतांचाही त्यांत समावेश केलेला आहे; त्याप्रमाणेच हिंदुस्थान देशाचे प्राचीनत्व, त्या देशाचा अति प्राचीन कालापासून इतर देशाशीं चालू असलेला व्यापार व त्याचे राजकीय दळणवळण, चीन, इराण, रोम वगैरे प्रदेशांबरोबरील हिंदुस्थानचा राजकीय संबंध वगैरे संबंधीही त्यांत त्रोटक माहिती दिली आहे.
 युरोप खंडांतील पूर्वकालीन परिस्थितीवरून कालमानाचे 'तमोयुग' 'मध्ययुग' व नवयुग असे तीन भाग पडतात. युरोपातील पूर्वकालीन राजकीय परिस्थिति पाहता, त्या काळांत रोमन साम्राज्य हे सर्व जगांत अत्यंत