Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९९ )

विभाग पाडिलेले असून त्यांतील प्रत्येकांत पांच पांच सभासद होते; या पैकी पहिल्या खात्याकडे उद्योगधंद्याची व्यवस्था लावण्याचे काम असून त्यांच्यावरच कलाकौशल्याची अभिवृद्धि करण्याची जबाबदारी असे; कामकरी लोकांच्या मजूरीचे दर ठरविणे, माल चांगला आहे की नाही हे पाहणे आणि व्यापार व उद्योगधंद्यासंबंधों उत्पन्न होणारे हरएक प्रश्न सोडविणें हें काम त्यांच्याकडेस सोपविलेलें होतें, आणि कामकरी लोकांच्या सुरक्षिततेसंबंधी म्हणजे व्यापार व उद्योगधंद्याची वाढ होणें बहुतांशीं या वर्गाचे कलाकोशल्य व मेहनत यावरच अवलंबून असल्यामुळे परंपरेनें व प्रत्यक्षही आपल्या राज्यांतील उद्योगधंद्याच्या वृद्धिसंबंधीं- इतकी काळजी घेण्यात येत असे कीं अशा कामकरी माणसाच्या हातोस व डोळ्यास इजा करण्याच्या गुन्ह्याबद्दल देहांत शिक्षा ठरविण्यांत आलेली होती; यावरून इतक्या प्राचीनकाळ ही राजसत्तेकडून आपल्या राज्यांतील उद्योग-धंदे विषयक प्रगति संबंधानें किती काळजी घेतली जात असे, ही गोष्ट मनन करण्यासारखी आहे; पहिल्या खात्यानंतर दुसऱ्या खात्याकडे पाहता त्याकडे परदेशीय वकील, प्रवासी, वगैरे लोकांची व्यवस्था सोपविलेली असून त्यांच्या राहण्याची, तैनातीची व औषध पाणी व इतर आवश्यक गोष्टींची व्यवस्था याच खात्याकडून होत असे. या प्रमाणेच असा कोणताही परदेशीय मनुष्य मृत झाल्यास त्याची अखेरची व्यवस्था लावणे, त्याच्या मालमत्तेची नोंध करून, व त्याच्या वारसाचा तपास करून ती त्याच्याकडे पाठविणें, वगैरे सर्व व्यवस्थाही याच खात्याकडे सोपविलेली असे. या वरून व्हिन्सेंट स्मिथ यानें म्हटल्याप्रमाणे सदर खात्याचे अस्तित्व है खरोखरच या साम्राज्याचे परकीय राज्यार्शी कसें जिवंत दळणवळण होतें, याचा स्पष्ट पुरावा आहे, असे निदर्शनास येतें; तिसरें खातें म्हणजे जन्म-मृत्यू नोंघ खातें हैं असून त्या खात्याकडे जन्म-मृत्यूची नोंध करण्याचे काम सोंपविलेले होतें; आणि सरकारास आपल्या प्रजेची माहिती मिळावी, आणि कर बसविण्याच्या अथवा कमी करण्याच्या प्रसंग सगवड व्हावी, म्हणून हे खाते निर्माण केलेले होतें; ही नोंघ झाडाच्या सालीवर किंवा कापडावर करीत असत; कारण त्यावेळी कागदाचा शोध लागलेला नसून झाडांच्या साली व कापड यांवर लिहिण्याचा प्रघात होता. ही नोंध विशेष दक्षतेनें घेण्यांत येत असे; या संबंधी