Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९८ )

राजा दूरवरच्या प्रवासास निघतांना नेहमीं इत्तीवर सोन्याच्या हौद्यात बसून जात असे; राजधानींत नेहमीं हत्ती, गेंडे, पोळ, व एडके, यांच्या टकरांचे खेळ, मल्लांच्या कुस्त्या, व घोड्यांच्या आणि बैलांच्या शर्यतीं, होत असत; राजाची मुख्य करमणूक म्हणजे शिकार ही असून, शिकारीस जाताना, त्याच्या संरक्षणाकरितां बरोबर सशस्त्र स्त्रिया असत; राजा दररोज-दिवसांतून एकदा तरी खुस्या दरबारांत बसत असे, आणि त्यावेळीं लोकांचे अर्ज घेऊन त्यांचा स्वतः निकाल करीत असे; या चंद्रगुप्ताच्या साम्राज्याचें वैभव वृद्धिंगत करण्यास कारणीभूत असलेली व होणारी त्याची बलाड्य सेना, ही, मनुष्यबलानें प्रचंड, अत्यंत सुव्यवस्थित, व जय्यत सामुग्रीनें समृद्ध, अशी असून, त्या काळांत उपलब्ध असलेली सर्व शस्त्रे व साधने यांनी युक्त अर्शी होती. हें सैन्य खर्डे असून त्यास सरकारांतून वक्तशीर व भरपूर पगार, घोडे, शस्त्रास्त्रें व इतर युद्धविषयक आवश्यक ती सामुग्री मिळत असते; मॅगॅस्थनीस च्या वेळेस चंद्रगुप्ताची फौज एकंदर सहा लक्ष नव्वद हजार होती; त्यांत नऊ हजार इत्ती, व आठ हजार रथ, असून दर हत्तीवर एक माहूत, व तीन तिरंदाज, अर्शी चार, माणसे असत; रथ दोन व चार घोड्याचे ही असून, दर रथावर सारथ्या शिवाय दोन लढवये शिपायी असत; म्हणजे नऊ हजार हुत्ती वरील ३६००० लोक, व आठ हजार रथांवरील २४००० लोक, मिळून ६०००० साठ हजार सैन्य, हत्ती व रथ मिळून असे; एकंदर फौजेत सहा लक्ष पायदळ, तीस हजार घोडेस्वार, व माठ हजार इत्ती-रथांचे सैन्य, मिळून एकंदर सैन्य सहा लक्ष नव्वद हजार होतें; शिवाय त्यानें स्वतंत्र आर मारही उभारिलें होतें, व या आरमाराचा आणि आपल्या एकंदर सैन्याचा बंदोबस्त ठेवण्याकरितां एक स्वतंत्र युद्धखातें निर्माण केले होतें; त्यांत तीस मंत्री किंवा अधिकारी असून पांच जणांचे एक अशीं तोस असामींची सहा मंडळें होती; त्यापैकी पहिले, आरमारी मंडळ असून त्याचा संबंध आरमारा- च्या मुख्य अधिकान्याशीं येत असे; दुसन्या मंडळाकडे सैन्य, सैन्यवाहन, व सैन्य पोषण, यांची जबाबदारी असून पायदळ, बोडदळ, युद्धरथ, व हत्ती, या चार अंगांची व्यवस्था बाकीच्या चार स्वतंत्र मंडळांकडे निरनिराळी सोंपविलेली असे; त्याप्रमाणेच पाटली पुत्र नगराकरितां एक शहर सुधराई खातें-म्युनसिपल डिपार्टमेंट-निर्माण केलेले असून त्यांतही तीस मंत्री होते; व त्याचेही सहा