Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९७ )

व यौग्य रीतीने वागणारे आहेत; त्यांची बाह्य वागणूक, त्यांचा स्वच्छपणा, आणि ते मोठ्या श्रद्धेनें पाळीत असलेले त्यांचे चमत्कारिक धार्मिक विधी, यामुळे म्यूसाऊथ वेल्स मधील आमच्या भिकार कैद्यांकडे आम्ही ज्या (तिटकाऱ्याच्या) दृष्टीने पाहतो त्याच दृष्टीनें या हिंदू कैद्यांकडेही पाहणे अशक्य आहे. (Anatura- lists Voyage round the world पान ४८४ पहा ) या वरून, अत्यंत आप तींत असतांनाही आर्य तेज कसे उमटून पडतें, हे लक्षात येईल.
 हिंदुस्थानांतील पूर्वकालीन राजे रजवाड्यांची राज्यव्यवस्था, राज्यपद्धति व राजनीति या बद्दल मार्गे त्रोटक विवेचन केलेले आहेच; तथापि शिकंदर बादशहाच्या स्वारीच्या वेळेस उत्तर हिंदुस्थान किर्ती सुधारलेल्या स्थितींत होतें, है बऱ्याच विस्ताराने दाखविण्या करितां, मौर्य घराण्यांतील साम्राटां संबंधीं मॅगॅस्थेनीस यानें ग्रंथित केलेली व इतर उपब्ध असलेली हकीकत या ठिकाणीं पुन्हां दिग्दर्शित करणे आवश्यक आहे. मॅगॅस्थेनीस हा राजा सेल्यूकस याचा, चंद्र गुप्ताच्या दरवारांत वकील म्हणून असून तो चंद्र गुताच्या राजधानीचें शहर जे पाटली पुत्र त्या ठिकाणी बरेच दिवस राहिला होता; त्यावेळी त्यानें त्या साम्रा- ज्याच्या तत्कालीन राजकीय व सामाजिक स्थितिचे चौकसपणानें निरिक्षण करून जे वर्णन केले आहे त्यावरून तत्कालीन स्थितिचें योग्य ज्ञान होण्यास पुष्कळच मदत होते; तो म्हणतो:- "पाटली पुत्र या नगराची लांबी सुमारें नऊ मैल असून त्याची रुंदी दीड मैल होती; त्या राजधानीच्या सभोवती लांकडांचा मोठा मजबूत तट असून त्यास ७६४ वेशी व ५७० बुरूज होते; व त्याच्या समवर्ती विस्तीर्ण व खोल खंदक असून तो शोण नद्राच्या पाण्याने नेहमीं तुडुंब भररेला होता. त्याप्रमाणेंच राजवाडा ही मोठा भव्य व प्रशस्त असून त्यांतील खांबास सोन्याचा मुलामा केलेला होता, व त्यावर सोन्याचे द्राक्षवेल, व त्यामध्यें चांदीचे पक्षी कोरलेले होतें; राजवाड्याच्या समोवार मोठमोठीं विस्तीर्ण उद्यानें असून त्यांत पुष्कळ कारंजी व हौद तयार केलेले होते, व त्यांत बहुविध प्रकारचे मासे आणून सोडिलेले होते; राजवाड्यांतील सामान सोन्याचांदीचें असून दोन दोन तीन तीन हात रुंदीची व तीस साजेशाच लांचीची- सोन्याची ताटें होतीं; त्या प्रमाणेच कलाकसूरीचों नक्षी केलेलीं मेजें व कुशल नक्षी केलेल्या खुर्या त्या ठिकाण होत्या; राजाचे वापरावयाचे झगे भरजरी व मोठ मोठे असून त्याच्या स्वारीची पालखी सोन्याची होती; व तिला खण्या मोत्याचे घोंस लाविलेले होते.