Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९६ )

झाले आहे; तें असें कीं, सरासरी चार वर्षांचा हिशोब पाहता इंग्लंड आणि वेल्स मिळून दरवर्षी देहांत शिक्षा दिलेल्यांचे प्रमाण २,०३,२८१ माणसांस एक हे आहे; आणि बंगाल इलाख्याच्या ताव्यांखालील प्रदेशांत हे प्रमाण १,००४, १८२ माणसांस एक हैं आहे: इंग्लंड मध्ये काळ्या पाण्याच्या शिक्षेचे प्रमाण ६७१७३ माणसांस एक हैं आहे, आणि बंगाल मध्ये ४०२०१० माणसांस एक हे प्रमाण आहे. इंग्लंड मधील देहांत शिक्षेचा वार्षिक आंकडा १२६२ हा असून बंगाल मधील आंकडा ५९ हा आहे; आणि लोकसंख्येचे प्रमाण पाहता इंग्लंडची लोकसंख्या १३०००००० असून बंगाल प्रांताची लोक संख्या ६००००००० आहे; त्याप्रमाणेच हिंदूलोकांची साधी राहणी व साधे अन्न, या गोष्टीही त्यांच्या विशेष निरोगी पणास कारणीभूत झालेल्या आहेत; उदाहरणार्थ, इ. सन १८८१ मध्यें - बंगाल प्रांताच्या खाने मुमारीच्या इंग्रजी रिपीटर्टाच्या पहिल्या भागांतील २०४ पानामध्ये एक तुलनात्मक पत्रकाच्या आकाराचा तक्ता जोडिलेला आहे; त्यावरून असे दृश्टोत्पत्तीस येतें कीं, हिंदुस्थानात हिंदूलोकांनी वस्ती केलेल्या भागात दर दहा हजार मनुष्या मार्ग तीन, हुं वेड्यांचे प्रमाण पडले; पण इंग्लंड आणि वेल्स मिळून हेच प्रमाण दर दहा हजारी तीस हे पडले; वरील तुलनेवरून हिंदुस्थान व इंग्लंड या दोन देशातील सर्व साधारण सामाजिक स्थितीमधील परक कोणाच्याही सहज लक्षांत येऊन योग्य अनुमान काढितां येईल, असे म्हण- ण्यास हरकत नाहीं.
 हिंदू लोकांचे शील, त्यांची संस्कृति व त्यांचा स्वभाव याबद्दल निरनिराळ्या लेखकांनी जे वर्णन केले आहे, त्याचे नमुन्यादाखल थोडेसें विवेचन वर केलेले असून ते कोणाही हिंदूस अभिमानास्पद असेंच आहे, यति संशय नाहीं; तथापि त्यांतल्या त्यांतही ही गोष्ट या ठिकाणीं नमूद केली पाहिजे कीं, शिक्षा भोगीत असलेला हिंदू मनुष्यही, तो कैदी असून सुद्धां, इतरांच्या मानानें श्रेष्ट ठरत असून त्याबद्दल असा पूर्वीचा एक दाखला उपलब्ध झाला आहे कीं, पोर्ट लुई येथें शिक्षा भोगीत असलेले हिंदू.. कैदी पाहून, प्रसिद्ध डावन यांत नवल वाटले; आणि हे असे उमद्या चेहऱ्याचे लोक पाहून तो अश्चर्य चकित झाला. तो म्हणतो " हे लोक सर्व साधारणतः शांत