Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९५ )

ही अवर्णनिय आहे; शिवाय तो आणखी असेही म्हणतो कीं, इंग्लंडमध्ये ज्या कित्येक गोष्टी इतिहासास नव्हे तर कादंबरीस साजेशा वाटतील तशा प्रकारच्या परमावधीस गेलेल्या पुष्कळ गोष्टींचे दाखले मला माहीत आहेत; व हिंदू लोकांच्या इमानाविषयों तो असे म्हणतो की मला जी काही माहिती आहे, त्यावरून मला असे वाटतें कीं, सर्व साधारणतः हिंदू लोकांइतकी दुसरी कोणतीही जात विश्वास पात्र नाहीं; त्याप्रमाणेच हिंदुस्थान देश व त्यांतील प्राचीन काळची अत्युत्तम संस्कृती याबद्दल प्रोफेसर मॅक्स मुल्लर यानें आपल्या ग्रंथांत ( Professor Max Muller's Indis; and Whatoan it teach us; पान ८ पहा) असे उद्गार काढिले आहेत की, सर्व जगांत निःसर्गदत्त संपत्ति, सामर्थ्य आणि सौंदर्य, यांनी समृद्ध आणि कांहीं भागांत तर केवळ नंदन वनच असा देश जर कोणी मला दाखवा म्हणून सांगितले तर मी हिंदुस्थान देशांकडे बोट दाखवीन; आणि जर मला कोणी असे विचारिलें कीं भूतलावरील कोणत्या भागांत मानवी बुद्धिमत्तेच्या अत्युत्तम देणग्या विकास पावलेल्या आहेत, आणि तिनें जीवित- गूढांतील प्रश्नांचा उत्कृष्ठपणे छडा लाविला आहे आणि प्लेटो व कँट यांचा अभ्यास करणारांचें लक्ष आकर्षण केले जाईल अशा रीतीने त्या प्रश्नां पैकीं कांहींचा समाधानकारक निकाल तिन कोठें लाविला आहे असे जर मला कोणी विचारले तर मी तो देश म्हणजे हिंदुस्थान हा होय, असे त्यास बोटानें दाखवीन; त्याप्रमाणेच मुंबई इलाख्याचा माजी गव्हर्नर माऊंट स्टूअर्ट एलफी- न्स्टन याने आपल्या हिंदुस्थानच्या इतिहासांत (पान २०२-३७५-३८१ पहा.) जी हकीकत लिहिली आहे त्यात तो म्हणतो की, दारूवाजीची परमावधी, या चायतींत, व इतर दुर्गुणांचा अतिरेक, यांत हिंदूलोक आमच्या इंग्रज लोकांच्या -मानानें श्रेष्ठ असून आमच्या मोठमोठ्या शहरांत जशी कित्येक मंडळी नैतिक अधोगतीस पोहोचलेली असतात, तसे लोक हिंदूमध्यें आढळून येणार नाहीत; शिवाय हिंदू लोकांची स्वच्छता, त्यांची वागण्याची पद्धत, त्यांची स्वामिभक्ति व इमानीपणा या बद्दल ही त्यानें स्तुतीपर उद्गार काढिले आहेत; त्याप्रमाणेच इ० सन १८३२ मध्ये लंडन येथे हाऊस ऑफ कामन्स, म्हणजे साध्या लोकांच्या "सभेपुढें, ठेविलेल्या अनेक रिपोर्टावरून हिंदुस्थानांतील बंगाल प्रांत, व इंग्लड देश, यो मधील गुन्ह्यांच्या प्रमाणाची तुलना केलेली आहे; त्यांत इंग्लंडच्या मानानें हिंदुस्थानांतील बंगाल प्रांतातील गुन्हयाचे प्रमाण कमी असल्याचे सिद्ध