Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९४ )

पळून जाणं म्हणजे काय, हे त्यांना माहीत नाहीं; ते आपल्या गुरुवर अत्यंत भक्ति करितात, व ईश्वराप्रीत्यर्थ स्वदेह अर्पण करण्यासही ते मार्गे पुढे पहात नाहींत; " त्या प्रमाणेंच प्रसिद्ध ब्रिटिश मुत्सद्द सर टॉमस मनशे यांस एकदां असा प्रश्न विचारण्यांत आला होता की, इग्लंड बरोबरील हिंदुस्थानच्या व्यापारावरील प्रतिबंध काढून टाकून तो अप्रतिबंधक केला तर त्यामुळे हिंदू लोकांच्या सहकृतिची अधिक वाढ होईल काय ? त्यावर मनरो यानें असें उत्तर दिले की, हिंदू लोकांची सुधारणा अथवा संस्कृती, याचा अर्थ काय, हेच मुळीं मला बरोबर समजत नाहीं. भिन्न भिन्न प्रकारचे उच्च दरजाचें शास्त्रीय ज्ञान, मुव्यवस्थित राज्य शासन पद्धतीचे ज्ञान आणि आपले दुराग्रह व अंध विश्वास सोडून देऊन सर्व प्रकारचे व सर्व ठिकाणचे संपादन करण शक्य असलेले सर्व ज्ञान, यांत हिंदू लोक युरोपियन लोकांच्या मानानें कनी प्रतीचे आहेत; परंतु उत्कृष्ट शेतीची पद्धति, शिल्पकामांतील अनुश्मेय कौशल्य ऐपाराम अथवा उपयोग या करिता कोणत्याही वस्तू तयार करण्याची पात्रता, लिहिणे, वाचणं, व गणीत वगैरेच्या अध्ययना करितां गांवगन्ना उचडण्यात आलेली विद्यालय, अतिथसत्कार, दानशीलता, व सर्वाहून श्रेष्ट म्हणजे स्त्रिया बद्दल असलेला आदर युक्त व्यवहार, हीं जर सुधारणेची लक्षणे असतील तर हिंदू लोक युरोपियन लोकांहून केव्हां श्रेष्टच आहेत; आणि माझी अशी खात्री आहे कीं, "नुशरणा" ही जर एक व्यापाराची वस्तू म्हणून झाली तर इंग्लंडला ती हिंदुस्थानांतून मागविण्यांत फायदा होईल. " त्याप्रमाणेच मेगास्थनीस हा हिंदुस्थानांत आल्यावर त्याला जो स्थिती आढळून आली त्याबाबतीत त्याने जे वर्णन केले आहे, त्यात गुलामगिरीचा आभाव, स्त्रियांचे अवर्णनीय पतित्य, आणि पुरुषांचे अलौकिक धैर्य, या बद्दल त्यानें स्तुतिपर उद्गार काढिले आहेत; तो आणखी असे म्हणतो की आशिया खंडांतील इतर सर्व लोकांपेक्षां ते अधिक र असून शांत, उद्योगी, उत्तम शेतकरी, व निष्णात कारागीर आहेत. ते ऋचीत्च न्यायालयाची पायरी चढतात, व ते आपल्या एतद्देशीय राज्यकर्त्यांच्या अमलाखाली शांतपणाने कालक्रमणा करीत असतात. ( Hunters Gazetteer; “India'?; Page 266;) सरजान म.लकम यांनेही विषयों असेच अभिनंदनपर उद्गार काढिले असून तो म्हणतो कीं, हिंदू लोक हे शूर, उदार, व दयाळू असून त्यांचे धैर्य है जितकें अवर्णनीय आहे, तिर कीच त्यांची सत्यप्रयता